Prakash Ambedkar : सीमावाद प्रकरणात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोषी, प्रकाश आंबेडकरांचे खळबळजनक वक्तव्य
Prakash Ambedkar : राज्यात सुरु असलेला सीमावाद प्रकरणात राष्ट्रवादी आणि काँग्रेस दोषी असल्याचे वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
Prakash Ambedkar : आधी मोर्चात सीमावाद (Maharashtra Border Dispute) विषय नव्हता, राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये (Shivsena) यावरून कुरघोडी, हा विषय दुपारच्या भाषणात क्लिअर होईल, असे स्पष्टीकरण वंचित बहुजन आघाडीचे ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी दिले आहे. आज मुंबईत महाविकास आघाडीचा महामोर्चा सुरु असून याबाबत आंबेडकर यांनी वक्तव्य केले आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या (Vanchit Bahujan Aaghadi) माध्यमातून नाशिक (Nashik) धम्म मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आज नाशिकमध्ये आहेत. थोड्याच वेळात नाशिक शहरातील गोल्फ क्लब मैदानावर धम्म मेळाव्यास सुरवात होत आहे. तत्पूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी शिवशक्ती भीमशक्ती युतीसह आजच्या मोर्चाबाबत महत्वाचे वक्तव्य केले. ते म्हणाले, शिवाजी महाराजांबद्दल राज्यपालांनी जे वक्तव्य केले, ते करायला नको होत, राज्यपालांच्या वक्तव्यामुळे लोकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे राज्यात सुरु असलेला सीमावाद प्रकरणात राष्ट्रवादी आणि काँग्रेस दोषी आहेत. मात्र आता अविकसित गावे आता सेनेला ब्लेम करतील अशी शक्यता असल्याची ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, सेनेने राजकीय समझोता आणि आंदोलने या दोन गोष्टी वेगळ्या ठेवल्या तर त्यांच्यावर शिंतोडे कमी उडतील. मात्र शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसचे शिंतोडे स्वतःवर ओढवून का घेत आहे? असा सवाल आंबेडकरांनी उपस्थित केला. विशेष म्हणजे आज महाविकास आघाडीचा महामोर्चाचे आयोजन करण्यातआले आहे. महागाई, बेरोजगारी, महापुरुषांवरील वक्तव्याच्या निषेधार्थ, सीमावाद प्रश्न आदी मुद्द्यांवर हा मोर्चा काढण्यात आला आहे. मात्र मोर्चाच्या विषयात सीमावाद नव्हता, पण काल अजित पवार प्रेस मध्ये बोलले की सीमावादच मोठा विषय असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे महाविकास आघाडीत आता कुरघोडी सुरू झाली आहे. शिवसेनेचा हा अजेंडा की राष्ट्रवादीचा? दुपारच्या भाषणात कळेल की हे क्लिअर होईल की कोण कोणावर कुरघोडी करतय? असे उत्तर देखील यावेळी प्रकाश आंबेडकरांनी दिले.
शिवाय आजच्या महामोर्चात शिवसेना आपली ताकद दाखवेल. त्याचबरोबर महामोर्चा संदर्भात उद्धव ठाकरेंशी माझं बोलणं झालं होत, तेव्हा त्यांना सांगितलं होतं की शिवसैनिक उत्साहित आहेत, एकच आहोत दाखवायला, त्यामुळे त्यांना सांगितलं होतं की हा कार्यक्रम आपणच सेनेच्या खाली करा, पण ते म्हणाले की आमचं सरकार होत, सगळ्याचं त्यामुळे सगळे करू असं देखील प्रकाश आंबेडकर म्हणाले. सुषमा अंधारेंसारखी अनेक कॉंट्रोव्हर्सी आहेत, त्यावर बोलणार नसल्याचे ते म्हणाले. एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर म्हणाले, एकनाथ शिंदेंनी माझी भेट घेतली होती, तेव्हा ते बाबासाहेब आंबेडकर यांच्या नातवाला भेटायला आले होते, मी जेव्हा त्यांना भेटायला जाईल तेव्हा तो राजकीय मुद्दा असेल, असे ते म्हणाले.