Nashik Chitra Wagh : नाशिक (Nashik) येथील टोल नाका तोडफोड प्रकरण चांगलंच गाजत असून यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी देखील आसूड ओढला आहे. 'टोलनाके लोकांच्या पैशातून बांधले जातात. त्यामुळे टोलनाके फोडणं फार सोपे आहे, काहीतरी बनवायला शिकलं पाहिजे. फोडायला अक्कल लागत नाही.. जोडायला आणि बनवायला मात्र अक्कल लागते', असा सणसणीत टोला चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी लगावला आहे.
भाजप नेत्या चित्रा वाघ आज नाशिक (Nashik) दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या बोलत होत्या. सिन्नरजवळील (Sinnar) गोंदे येथील टोलनाका प्रकरणावर (Toll Issue) त्यांनी प्रकाश टाकत 'तिथे नक्की काय झालं मला माहित नाही, पण झालेली गोष्ट निषेधार्थ आहे. याचबरोबर त्यांनी मनसेचा खरपूस समाचार घेतला आहे. 'टोलनाके लोकांच्या पैशातून बांधले जातात. त्यामुळे टोलनाके फोडणं फार सोपे आहे, काहीतरी बनवायला शिकलं पाहिजे. फोडायला अक्कल लागत नाही.. जोडायला आणि बनवायला मात्र अक्कल लागते', असा सणसणीत टोला चित्रा वाघ यांनी लगावला आहे.
चित्रा वाघ यांनी यावेळी अनेक मुद्द्यांवर प्रतिक्रिया व्यक्त केली. दरम्यान नाशिकसह धुळे (Dhule) येथील गरोदर महिलांना झोळीत नेट असल्याचे व्हिडीओ समोर आले. यावर त्या म्हणाल्या की, गरोदर माता झोळीत नेण्याच्या घटना हे प्रश्न अत्यंत गंभीर आहे, संवेदनशील आहे. या अगोदर देखील अशा घटना घडल्या असून अधिवेशनात आमचे लोकप्रतिनिधी हा प्रश्न मांडतील, या त्रुटी सोडवल्या जातील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तर मणिपूरच्या घटनेवर त्या म्हणाल्या की, मणिपूरमध्ये झालेल्या घटनेचे समर्थन नाहीच. आम्हाला देखील अतीव दुःख आहे. राजस्थान येथील काँग्रेसच्या नेत्याचा एक व्हिडिओ आहे. त्यात तो म्हणतोय की, मंत्र्यांनी कशा पद्धतीने महिलांचे शोषण केले, यावर लिहिलं, तर पिक्चर निघेल, असही चित्रा वाघ म्हणाल्या.
मणिपूरची चर्चा हाऊसमध्ये करा
तसेच राहुल गांधी संसदेत नसल्याने संसद चालू द्यायची नाही, असा पवित्रा विरोधकांनी घेतला आहे. महिलांच्या प्रश्नावर सरकार म्हणतंय, की आपण चर्चा करू, मात्र विरोधक केवळ राजकारण करत आहे. त्यांनी काहीही घेणं देणं नाही. मणिपूरच्या घटनेत काही तासांत आरोपी पकडले गेले. ज्यावेळी सरकार सांगत आपण मणिपूरच्या प्रश्नावर चर्चा करू, त्यावेळी विरोधी पक्ष का येत नाही? प्रश्न मीडियासमोर गेल्याने सुटत नाही, हाऊसमध्ये आल्याने सुटतात. पश्चिम बंगालची एक महिला मुख्यमंत्री तिथल्या महिलांचे दुःख समजू शकत नाही का? असा सवाल करत हिंमत असेल तर मणिपूरची चर्चा हाऊसमध्ये करा. तेव्हाच मणिपूर, मालदा आणि राजस्थानची चर्चा होईल, असेही त्या म्हणाल्या.
ईतर महत्वाच्या बातम्या :