Nashik Crime : नाशिकमध्ये (Nashik) कायद्याचे राज्य आहे की गुन्हेगारांचे अशी परिस्थिती निर्माण झाली असून पुण्यापाठोपाठ नाशिकमध्ये (Nashik) कोयता गॅंग धुडगूस घालत असताना पोलीस आहेत तरी कुठे? असा संतप्त सवाल नाशिककर उपस्थित करत आहेत. पोलिसांच्या या बोटचेपी भूमिकेमुळे ग्रेपसीटी नाशिकची ओळख आता क्राईम सिटी (Crime City) होऊ होवू लागली आहे. पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.
कधी गाड्याची तोडफोड, कधी गाड्यांची जाळपोळ, कोयते तलावरी नाचवत टोळक्याचा बाबर रस्त्यात धुडगूस, तर कधी भर रस्त्यात धारदार शस्त्राने खून.. कधी दोन गटात लाठ्या काठ्या, तलावरी घेऊन हाणामारी तर कधी मागील भांडणाची कुरापत काढून प्राणघातक हल्ला.. कधी एटीम मशीनची चोरी तर कधी बँकेच्या स्ट्रॉंगरुमच्या छताला भगदाड पाडून दरोड्या प्रयत्न... हे सर्व घडतंय शांत, सुसंस्कृत धार्मिक शहर असणाऱ्या नाशिकमध्ये आणि या घटना खूप दिवसांच्या, वर्षांतील नाही तर अवघ्या 20 ते 25 दिवसांतील आहे. नाशिकरोड (Nashikroad Police) परिसरातील विहितगावात बुधवारी मध्यरात्री वाहनांची जाळपोळ तोडफोडची घटना घडल्यानंतर आज पुन्हा धोंडगे मळा, जगताप परिसरात ही तलवारी कोयते नाचवीत रात्री बारा एकाच्या सुमारास सहा वाहनांची तोडफोड झाल्याने नागरिक संतप्त आणि तेवढेच दहशतीत आहे. यात एका पोलीस अधिकाऱ्याच्या वाहनाचाही समावेश आहे.
दरम्यान गावगुंडांचे 8 ते 9 जणांचे टोळके रात्री तलावरी कोयते हातात घेऊन दिसेल, ती गाडी फोडत होते. नागरिकांना त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला, मात्र हल्लेखोर पळून गेले. समोर उभ्या असणाऱ्या पोलिसांना नागरिकांनी गावगुंडांचा पाठलाग करण्याची विनंती केली. मात्र गाडीची क्लजप्लेट खराब आहे, असल्याची सबब पुढे करत पोलिसांनी उदासीनता दाखवली. एकीकडे नाशिक पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली शहरात चार पोलीस उपायुक्त, 7 सहाय्यक पोलिस आयुक्त सायबरसह 14 पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक, विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक असे 70 हून अधिक अधिकारी आणि हजारोचा स्टाफ तैनात आहे. मात्र तरीही नाशिककर सुरक्षित नाही. गेल्या आठ-पंधरा दिवसात शहर पोलीस अधिकारी कर्मचारीच्या बदल्या केल्या जात आहेत. मात्र त्याचा कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यात फारसा सकारात्मक बदल झाल्याचे अद्याप निदर्शनास आले नाही.
मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेकीची घटना घडल्यानंतर पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची नाशिक पोलीस (Nashik Police) आयुक्तपदी बदली झाली. शहरातील खुनाचे, वाहन तोडफोड जाळपोळच्या घटनांचे सत्र बघून नावात 'अंकुश' असून उपयोग नाही' नाही तर गुन्हेगारीवर 'अंकुश' हवा अशी संतप्त प्रतिक्रिया नागरीक देत आहे. मागील 7 महिन्यात शहरात 20 हुन अधिक खुनाच्या घटना घडल्यात. टोळक्याच्या हाणामाऱ्या धुडगूस हा तर नित्याचाच विषय ठरला आहे. मागील एक महिन्याच्या घटनाक्रम जरी लक्षात घेतला तरीही शहरातील गुन्हेगारी किती मोठ्या प्रमाणात वाढली आहे, याचा अंदाज येत आहे.
जुलै महिन्यात नाशिकची गुन्हेगारी
7 जुलै शिंगाडा तलाव 2 गटात हाणामारी तलवार कोयत्याने हाणामारी, 9 जुलै atm मशीन चोरून नेले सामन गाव नाशिकरोड, 10 जुलै अंबडच्या महाकाली चौकात 2 गटात हाणामारी लाठ्या काठ्या दांडके घेऊन हाणामारी, 12 जुलै सिडको परिसरात 16 गाड्यांची तोडफोड, 16 जुलै उंटवाडी परिसरात तरुणावर तलवारीने हल्ला, 20 जुलै अंबड परिसरातील इंडियन बँकेवर दरोडा टाकण्याचा प्रयत्न, योगायोगाने पोलीस पोहचले, दरोडेखोर पसार झाले. 22 जुलै तुषार चावरे तरुणाचा बोधले नगर परिसरात भररस्त्यात वार करून खून, 24 जुलै विहितगाव परिसरात मध्यरात्री हातात कोयते मिरवत तरुणांचा धुडगूस गाड्यांची 18 तोडफोड आणि जाळपोळ झाल्याची स्थानिकांची माहिती, 25 जुलै मध्यरात्री धोंगडे नगर, जगताप मळा परिसरात 6 गाड्यांची तोडफोड
नाशिक शहरात ड्रग्जचे रॅकेट सुरू?
नाशिक शहरात ड्रग्ज चे रॅकेट सुरू झाल्याची चर्चा लोकप्रतिनिधी विधिमंडळात त्याविषयी भाष्य करतात. नाशिकची तरुणाई ड्रगच्या आहारी जात आहे, मात्र ती आटोक्यात आणण्यासाठी कारवाई होताना दिसत नाही, अधिकारी लोकप्रतिनिधी ना जुमानत, गुन्हेगारीवर पोलिसांचा 'अंकुश' नाही, याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना सोसावा लागत असून नागरीक गावगुंडांच्या दहशतीखाली जगत आहेत. जिल्ह्याला मंत्रिमंडळातील दोन वरीष्ठ मंत्री लाभलेत मालेगाव मध्य आणि इगतपुरी वगळता सर्वच आमदार सत्तेत आहेत, मात्र हे सर्व लोकप्रतिनिधी नागरिकांना सुरक्षित जगणं ही देऊ शकत नसल्याची भावना व्यक्त होत असून नाशिक दत्तक घेणारे गृहमंत्री नाशिककडे लक्ष देतील का? याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.
ईतर संबंधित बातम्या :