Chitra Wagh on Kirit Somaiya : महिलांच्या सहकारी संस्था चालू करून त्यांना सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे, अशी माहिती भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी दिली आहे. कोल्हापूर शहरात 25 सहकारी संस्था झाल्या आहेत, महिला सेवा सहकारी संस्था आहेत या निमित्तानं महिलांनी सहकार क्षेत्रात प्रवेश केल्याची प्रतिक्रिया भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी दिली. शासकीय स्तरावरील कामं आता महिलांना हाती घेता येणार आहेत. तालुका स्तरावर महिलांना काम करण्याची संधी मिळणार आहे. राज्यस्तरावरील टीमची या सगळ्या संस्थांवर नजर असणार आहे, या संस्था पुरुषांच्या हातात जावू देणार नाही, असे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.  त्या आज कोल्हापूरमध्ये (Kolhapur News) बोलत होत्या. यावेळी त्यांनी बोलताना विविध मुद्यांवर भाष्य केले. 


'सोमय्या प्रकरणी कुणी ताई समोर आली पाहिजे'


चित्रा वाघ यांनी यावेळी किरीट सोमय्या यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओ प्रकरणी (Chitra Wagh on Kirit Somaiya)  प्रतिक्रिया दिली. किरीट सोमय्या प्रकरणी कुणी ताई समोर आली पाहिजे, असे त्या म्हणाल्या. जो प्रकार झाला तो चुकीचाच झाला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हाऊसमध्ये याबाबत आश्वासन दिलं आहे. या प्रकाराने आम्हाला धक्का बसला आहे. भविष्यात याची पाळंमुळं शोधली जातील, असेही त्यांनी सांगितले. 


मणिपूरच्या घटनेचा निषेध


मणिपूरमधील महिलांवर झालेल्या अत्याचाराचा मी निषेध करत असल्याचे त्या म्हणाल्या. त्यांनी सांगितले की, मी मणिपूरच्या घटनेचा निषेध करते, यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केलं आहे. विरोधकांना केवळ राजकारण करायचं आहे. चर्चेला तयार झाल्यानंतर विरोधक मागे गेले. कारण, राहुल गांधी हे संसदेत नाहीत, त्यामुळे याचं राजकारण केलं जात आहे. सगळ्यांनी मिळून अशा घटनेला विरोध केला आहे. मणिपूरबरोबर इतर ठिकाणी घडलेल्या घटनेवर विरोधक बोलत नाहीत. मी इथेच आहे कुठेही गेलेली नाही. 


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जे झालं ते नवीन नाही


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जे झालं ते नवीन नाही, ते होणारच होतं, कधी होणार हे फक्त माहीत नव्हतं. आता जे व्हायचं ते झालं आहे. आम्ही अजितदादा यांचं अभिनंदन केलं. त्यांच्याबरोबर आलेल्या सगळ्याचं आम्ही स्वागत केलं आहे.  रुपाली चाकणकर आणि माझं काही बांधाला बांध नाही, जिथं गोष्टी मनाला पटत नाही, तिथं आम्ही बोलून दाखवू असेही त्यांनी सांगितले. 


इतर महत्वाच्या बातम्या :