Nashik Maghi Ganesh : नाशिक (Nashik) शहरातील प्रसिद्ध असलेला चांदीचा गणपती (Chandicha Ganesh) संस्थांनच्या वतीने माघी गणेश जयंती (Ganesh Jayanti) निमित्त गणेशोत्सव मोठ्या  उत्साहात साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त श्रींच्या मंदिरात आज कालपासूनच दर्शनासाठी मोठी गर्दी झाली असून दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला आहे. यामध्ये श्रींची पूजा व महाप्रसाद तसेच गणेशाचा जन्मोत्सव साजरा करण्यात येत आहे. 


नाशिक शहरातील गणेश मंदिरांमध्ये (Ganesh temple) माघी गणेश जयंती (Maghi Ganesh Jayanti 2023) सोहळा धार्मिक वातावरणात आणि मंगलमय विधींनी साजरा करण्यात येत आहे. आज दुपारी नाशिक शहरातील गणेश मंदिरांमध्ये जन्मोत्सव साजरा करण्यात आला. पहाटेपासूनच पूजाविधीला प्रारंभ झाल्याने सकाळपासूनच चांदीच्या गणेश दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. नाशिक शहरातील चांदीचा सिद्धिविनायक गणपती, पगडी गणेश, साक्षी गणेश, ढोल्या गणपती, नवश्या गणपती, तिळा गणपती, इच्छामणी गणपती, पावन गणेश, मेनरोडचा गणपती यासह सर्व गणेश मंदिरात आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. जास्वंदीची फुले, दुर्वांचे हार अर्पण करून गणेशमूर्तींची आकर्षक हे गणेश जयंतीला लक्ष वेधून घेत आहे. 


दरम्यान माघ महिना हा अनेक वेगवेगळ्या धार्मिक कार्यांसाठी ओळखला जातो. त्याचप्रमाणे या माग महिन्यात गणेश जयंती येत असल्याने अनेक ठिकाणी रविवारपासूनच मागे गणेशोत्सव आला प्रारंभ झाला. आज 25 जानेवारीला माघ शुल्क चतुर्थी असून या चतुर्थीला गणेश जयंती साजरी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील चांदीच्या गणेश मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत. दरम्यान चांदीच्या गणपती मंदिरात दुपारी गणेश जन्मकाळ सोहळ्यावेळी गणेश पाळणागीते म्हणण्यात आली. तसेच आज सायंकाळी चांदीच्या गणपती मंदिर संस्थानच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. काल रात्रीपासूनच भाविकांच्या गर्दीने चांदीचा गणेश मंदिर परिसर फुलून गेला.


माघी गणेश जन्मोत्सव सोहळा


दरम्यान माघ महिन्यात येणारे शुल्क चतुर्थीला गणेश जयंती साजरी केली जाते या चतुर्थीला विनायक चतुर्थी आणि वर चतुर्थी अशीही म्हटलं जातं हे गणित जयंती गणपतीच्या महोत्कट अवतारासाठी साजरी केली जाते. पहाटेपासून मंत्रोच्चार आणि सनई वादनाने महाभिषेकाला झालेली सुरुवात, गणपती बाप्पा मोरयाचा होणारा गजर, पालखी मिरवणुकांनी वातावरणात निर्माण झालेले चैतन्य, गणपती अथर्वशीर्ष पठणाचा गुंजणारा स्वर, आकर्षक रांगोळ्या आणि गणेश आरतीच्या मंगल सुरावटींनी भक्तिमय झालेल्या वातावरणात माघी गणेश जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. चांदीचा गणपती येथे गणेश स्मरण, शांतीसुक्त, प्रधान संक्लप, मातृका पूजनासह इतर विधी करण्यात आले. पहाटे चार वाजता सनई वादनानंतर, गणेशमूर्तीचे अभ्यंग स्नान, महादुग्धाभिषेक आणि महाआरती करण्यात आली. दुपारी बारा वाजता गणेश जन्म व पाळणा आरती करण्यात आली.