Nashik Pathaan Movie : बहुचर्चित पठाण (Pathaan) चित्रपट प्रदर्शित झाला असून नाशिकमध्ये (Nashik) आज सकाळपासूनच चित्रपटगृहांना गर्दी पाहायला मिळत आहे. सकाळी सात शो तर हाऊसफुल असल्याचे दिसून आले. त्याचबरोबर थिएटरबाहेर (Nashik Theaters) अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 


बहुचर्चित पठाण चित्रपटाचा ट्रेलर रिलीज (Pathaan Trailer) झाल्यापासूनच हा चित्रपट वादात सापडला होता. त्यानंतर आलेल्या बेशरम रंग या गाण्याने तर अख्खा धुमाकूळ घातला या गाण्यावरून अनेक वाद झाले .तर चित्रपट रिलीज होण्याआधीच या चित्रपटाने बक्कळ कमाई देखील केली. त्यातच आजपासून हा चित्रपट सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित झाला असून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शाहरुख खान (shahrukh Khan) आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukon) यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. पहिल्याच दिवशी शो हाउसफुल असल्याचे पाहायला मिळाला आहे. तर दुसरीकडे बेशरम गाणे रिलीज झाल्यापासून या चित्रपटाला अधिक संघटनांनी विरोध दर्शवला होता. यामध्ये बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद या संघटनेने गाणे रिलीज झाल्यापासून ते चित्रपट प्रदर्शित होण्यापर्यंत चित्रपटावर आक्षेप घेत चित्रपट प्रदर्शित होऊ न देण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे नाशिकच्या चित्रपटगृहांच्या बाहेर बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे 


सुरवातीपासूनच पठाण चित्रपट वादात सापडला होता, शिवाय प्रदर्शित होऊ न देण्याचा इशारा दिल्यानंतरही हा चित्रपट हाउसफुल पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद या चित्रपटाला मिळत असल्याचा दिसून येत आहे. बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असलेला हा चित्रपट पाहण्यासाठी नाशिकमध्ये मालेगाव मधील शाहरुखच्या चाहत्यांनी तिकीट खरेदी केली असून नाशिकच्या चित्रपटगृहाबाहेर प्रेक्षकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. तब्बल चार वर्षांनी शाहरुख खान प्रमुख भूमिका असलेला चित्रपट पठाण चांगला चर्चेत आहे. 


बहुचर्चित पठाण चित्रपटात दीपिका पादुकोण, शाहरुख खान आणि जॉन अब्राहम ची प्रमुख भूमिका असून या अभिनेत्यांनी दमदार कामगिरी केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाचे शो सर्वच ठिकाणी हाऊसफुल असल्याचे पाहायला मिळाले आहे. नाशिकच्या चित्रपटगृहाच्या बाहेर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्याकडून कडाडून विरोध केला जात असताना पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. चित्रपट पाहण्यासाठी मोठी गर्दी असल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही, याची दक्षता पोलीस प्रशासनाकडून करण्यात आली आहे. नाशिकमधील चित्रपटगृहात चित्रपट पाहण्यासाठी मालेगावसह ग्रामीण भागातील देखील अनेक चाहते नाशिक शहरात आले आहेत. ऑनलाईन तिकीट बुकिंग करून हे चाहते पठाण चित्रपटांसाठी रांगा लावून उभे असल्याचे चित्र आहे.