Nashik Congress : एकीकडे भाजप अध्यक्ष जे पी नड्डा (JP Nadda) हे थोड्याच दिवसात नाशिक (Nashik) दौऱ्यावर येणार आहेत. आगामी निवडणुकांच्या पक्ष बांधणीसाठी हा मेळावा महत्त्वाचा ठरणार आहे. मात्र तत्पूर्वीच नाशिकमधून भाजपसह (BJP) आमदार सीमा हिरे (Seema Hiray) यांना मोठा धक्का बसला आहे. आमदार हिरे यांचे बंधू भालचंद्र पाटील यांनी काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेतला असून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. 


नाशिक शहरासह जिल्ह्यात भाजपचं (Nashik BJP) वर्चस्व असल्याचे सांगण्यात येते. मात्र ग्रामीण भागात अजूनही काँग्रेसला (Congress) मोठी मागणी असल्याचे अनेकदा दिसून येते. मात्र शहरात काँग्रेस शहर कमिटी जम बसवण्यात व्यस्त आहेत. अशातच काँग्रेसने मोठी झेप घेत भाजपचा शिलेदार गळाला लावला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या उपस्थितीत शहराध्यक्ष आकाश छाजेड यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी विविध पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला. प्रामुख्याने यात भाजपा आमदार सीमा हिरे यांचे बंधू भालचंद्र पाटील (Bhalchandra Patil) यांचा समावेश होता. पाटील यांच्या प्रवेशामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. तर पाटील हे काँग्रेस विचारसरणीचे असल्याने त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, असे स्पष्टीकरण हिरे कुटुंबाकडून देण्यात आले आहे.


राज्यातील सत्ताधारी शिवसेना व भाजपकडून राज्यभरात महाविकास आघाडीतील पदाधिकाऱ्यांना पक्षात घेण्यासाठी चढाओढ सुरु असतानाच मात्र नाशिकमध्ये काँग्रेसने भाजपला धक्का दिला आहे. नाशिक पश्चिमच्या विद्यमान आमदार सीमा हिरे यांचे बंधू भालचंद्र पाटील यांनाच पक्षात प्रवेश दिला आहे. मुंबईत झालेल्या सोहळ्यात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत शहराध्यक्ष आकाश छाजेड यांच्या नेतृत्वाखाली विविध पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यात आमदार हिरे यांची बंधू भालचंद्र पाटील, शिवसेना शिंदे गटाचे नाशिक रोडचे पदाधिकारी गुड्डू गवई, सिडकोतील सुमित सोनवणे यांचा प्रवेश सोहळा झाला. 


जेपी नड्डा नाशिक दौऱ्यावर येणार 


यावेळी छाजेड यांनी शहर काँग्रेसच्या कार्याचा अहवाल सादर केला. जिल्हा प्रभारी राजू वाघमारे यांनी या सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. प्रमोद मोरे, देवानंद पवार, विजय पाटील, अल्तमस शेख आदि यावेळी उपस्थित होते. दरम्यान नाशिक शहर व जिल्ह्यात भाजप लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांकडून केंद्रातील मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्यासाठी केंद्र व राज्यस्तरीय नेत्यांचा सभा मिळावे सुरू असतानाच आमदार हिरे यांच्या बंधूंचा काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे थोड्याच दिवसांत भाजप अध्यक्ष जेपी नड्डा नाशिकला मेळाव्यासाठी येत आहेत. त्यातच प्रभारी शहराध्यक्ष आकाश छाजेड यांनी केलेल्या खेळीबद्दल भाजपचा काँग्रेसमधील पदाधिकाऱ्यांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.


हेही वाचा


Nashik BJP Protest : काँग्रेसनं 'तो' व्हिडीओ डिलीट करावा, अन्यथा...; नाशिकमध्ये भाजपचं जोडे मारो आंदोलन