Jalgaon Gulabrao Patil : शासन आपल्या दारी (Shasan Apalya Dari) हा उपक्रम जनतेसाठी असून कार्यक्रमाला स्वतःहून लोक येत आहेत. कुणावरही सक्ती केलेली नाही. यावरून लक्षात येतंय कि, अद्यापही तुमच्या बापजाद्यांना ही कल्पना आली नाही की गरीब जनतेसाठी सरकार आहे. कार्यक्रमाला काळे झेंडे दाखवत आहेत. काळे झेंडे दाखविण्याचा धंदा आमचा आहे. झेंडे कसे दाखवायचे ते आमच्याकडून शिका, असा टोला लगावत मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्यासह भाजप (BJP) आणि शिवसेनेचे अनेक नेते, मंत्री जळगाव शहरात होते. आज जळगावमध्ये (Jalgaon) शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमात गुलाबराव पाटील बोलत होते. यावेळी त्यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून शासन आपल्या दारी हा उपक्रम राबविला जात आहे. गेल्या दोन महिन्यात राज्यातील लाखो लोकांना याचा फायदा झाला आहे. मात्र विरोधक यावर टीका करत आहे. मात्र सरकार चांगलं काम करत असल्याचे त्यांच्या जीवावर आली असल्याचे दिसून येत आहे, असे गुलाबराव पाटील म्हणाले. 


ते पुढे म्हणाले की, जळगाव जसा केळी, कापूस पिकासाठी प्रसिद्ध आहे. तसेच जळगाव हे बहिणाबाई चौधरी (Bahinabai Chaudhari) यांच्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे हे सरकार या सर्व महापुरुषांच्या विचारावर चालते आहे. लोकांमध्ये जाऊन काम करत आहे. त्याचमुळे शासन आपल्या घरून, आता आपल्या दारी आले आहे. कोणतेही शासकीय योजेनेतून होणारे कामकाज शासन आपल्या दारी उपक्रमातून होणार आहे. जळगाव जिल्ह्यासाठी मी काही मागणार आहे. काही दिवसांपूर्वी केळी महामंडळाची घोषणा झाली होती. त्यासाठी शंभर कोटी मिळावे, त्याचबरोबर जळगावला आयुक्त कार्यालय घोषित करावे, अशी मागणी करत आपल्या मागण्या मंजूर होतील यावर दोन्ही नेत्यांवर विश्वास असल्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. 


देवेंद्र फडणवीस बरसले... 


शरद पवार हे वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते, ते चाळीस आमदारांना घेऊन बाहेर पडले होते. त्यावेळी भारतीय जनता पक्षसोबत युती करून सरकार स्थापन केलं, त्याला मुत्सद्देगिरी म्हटलं गेलं. मग आमच्यासोबत युती करून निवडणूक लढवून उद्धव ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत गेले. त्यानंतर एकनाथ शिंदे बाहेर पडले. मग याला मुत्सद्देगिरी का नाही म्हटलं गेले, असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित करत विरोधकांवर निशाणा साधला. मागचे सरकार फेसबुक लाईव्ह सरकार होते. आमचे सरकार जनतेत जाऊन काम करते. चांगलं काम करूनही काहींना पोटदुखी आहे. या वयात काळी कामे करणे सोडा, आमची कामे सुरु आहेत, मात्र इतरांचे काळे झेंडे दाखवायचे काम करत असल्याची टीका यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केली. 


Maharashtra News : एकनाथ खडसे आणि गुलाबराव पाटील यांच्यात समझोता, दोघांमध्ये तडजोड झाल्याने खटला मागे