Nashik Girish Mahajan : महाविकास आघाडीत बिघाडी, इतर पक्षांची अवस्था शिवसेनेसारखी होईल, मंत्री महाजन यांचे सूचक वक्तव्य
Nashik Girish Mahajan : मविआचे तीन तेरा वाजले असून कोण कधी बाहेर पडेल हे सांगता येत नाही, असे सूचक वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.
Nashik Girish Mahajan : आगामी अधिवेशनाआधी नाशिकसह (Nashik) राज्यभरातून ठाकरे गटातून आउटगोइंग होणार असून मविआचे तीन तेरा वाजले आहेत. कोण कधी बाहेर पडेल हे सांगता येणं अवघड असल्याचे मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी सूचक वक्तव्य केले आहे. सध्या महाविकास आघाडीत बिघाडी असून अशातच इतर पक्षांची अवस्था शिवसेनेसारखी होईल, असा खळबळजनक दावा देखील महाजन यांनी केला आहे.
नाशिकमध्ये दोन दिवशीय भाजप प्रदेश कार्यकारिणीचे (BJP Meeting Nashik) बैठक सुरु आहे. आजचा दुसरा दिवस असून नाशिक शहरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री भारती पवार यांच्यासह अन्य दिग्गज नेते उपस्थित आहेत. यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधताना महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. काही दिवसांपूर्वी आमदार बच्चू कडू यांनी आगामी अधिवेशनाआधी विरोधी पक्षाचे दहा ते बारा आमदार फुटणार असल्याचा दावा केला होता. त्या अनुसरून आज मंत्री गिरीश महाजन यांनी वक्तव्य केले आहे. राज्यात लवकरच आमदारांची मोठी फळी फुटणार असल्याचे सूतोवाच गिरीश महाजन यांनी केले आहे.
भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीदरम्यान मंत्री गिरीश महाजन यांनी माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, राज्यात कधीही काहीही घडू शकत. काँग्रेसमध्ये आताच दोन गट पडले आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि एक गट विरोधात आहे. त्यामुळे लोक काँग्रेसला कंटाळले असून मविआचे तीन तेरा वाजले आहेत. अशात कोण केव्हा बाहेर पडेल हे सांगता येत नाही. मविआतील इतर पक्षांची अवस्था शिवसेना सारखी होईल, असे सूतोवाच त्यांनी यावेळी दिले. तर अनिल देशमुख आज नागपूरच्या निवासस्थानी परतत आहेत, यावर ते म्हणाले की, अनिल देशमुख यांचे स्वागत होत असेल तर यात नवीन काही नाही. या आधीही असे झाले आहे. जेवढा मोठा गुन्हेगार तेवढे मोठे स्वागत' असा सणसणीत टोलाही महाजनांनी लागवला आहे. दरम्यान भाजप सरकारने सुडाचे राजकारण केले, असे शरद पवार बोल्ट असतील तर न्यायालयाने एवढ्या दिवस अनिल देशमुख, नवाब मलिक यांना कोठडीत ठेवले नसते, असे स्पष्टीकरण महाजन यांनी दिले.
महाजनांनी सूत्रे सांभाळली...
दरम्यान दोन दिवशीय भाजप कार्यकारिणीची बैठक होती. मात्र काल मुंबईत नरेंद्र मोदी असल्याने देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळेसह मोठे नेते मुंबईत होते. त्यामुळे कालचे नियोजन हे मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे होते. प्रमुख नेते रात्री उशीरा येणार असल्याचे बघून महाजन यांनी सूत्रे सांभाळली. यावेळी त्यांनी व्यासपीठाच्या व्यवस्थेपासून तर चहापान, भोजन तसेच राज्यभरातून आलेल्या मंत्र्यांसह आमदार व प्रमुख पदाधिकाऱ्यांची खातिरदारी केली.