Nashik Chitra Wagh : राज्य सरकारच्या वतीने एसटी महामंडळात (ST Mahamandal) महिलांसाठी 50 टक्के सवलत (50 Percent) देण्यास सुरुवात केली आहे. कालपासून राज्यभरात या योजनेची अंमलबजावणी देखील सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी एसटीने प्रवास केला आहे. नाशिक येथील ठक्कर येथून ते मालेगाव (Nashik To Malegaon) असा बस प्रवास त्यांनी केला आहे.


पन्नास टक्के, महिला ओक्के


भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांचा मालेगाव (Malegaon) येथे मिळावा असून या मेळाव्यासाठी त्या अनेक महिलांसोबत एसटीच्या माध्यमातून रवाना झाल्या. यावेळी चित्रा वाघ म्हणाल्या कि, शिंदे फडणवीस सरकारचे आभार त्यांनी राज्यभरातील महिलांसाठी विशेषतः ग्रामीण भागातील महिलांसाठी विशेष अशी योजना सुरू केली आहे. राज्यभरातील महिलांसाठी ही फायदा होणार आहे. 50 टक्के एसटी भाड्यामध्ये सूट मिळणार आहे. पहिल्यांदा राज्यातील महिलांचा कुणीतरी विचार केला सगळ्याच एसटी प्रवासातून महिलांना सरसकट सूट देण्यात आली आहे. 'पन्नास टक्के, महिला ओक्के', अशी घोषणा देत त्यांनी सरकारचे आभार मानले.


महिलांसाठी नाशिक ते मालेगाव प्रवास आता 85 रुपये


नाशिक ते मालेगाव साधारण 165 रुपयांचे तिकीट आहे. मात्र महिलांना आता अवघ्या 85 रुपयात नाशिक ते मालेगाव प्रवास होणार आहे. नाशिक ते मालेगाव 120 किलोमीटर असून पहिल्यांदा महिलांना हा प्रवास 165 रुपयांना होत होता. मात्र आता हा प्रवास अवघ्या 85 रुपयात होत आहे. यावेळी चित्रा वाघ म्हणाल्या की, "सिलेंडरचे दर सुद्धा येणाऱ्या दिवसांमध्ये निश्चित कमी होतील. आपण बघितलं की कोरोनाच्या काळामध्ये संपूर्ण देश ठप्प असताना या देशातल्या प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे यातून सावरायला थोडा वेळ लागेल, मात्र देशातील प्रत्येक माणसाचं काम येणाऱ्या दिवसात होईल." त्याचबरोबर येणाऱ्या दिवसांमध्ये एसटी महामंडळ अधिक सशक्त करण्याचा प्रयत्न शिंदे फडवणीस सरकार निश्चित करेल, असा विश्वास वाघ यांनी व्यक्त केला. 


महिलांना तिकिट दरात 50 टक्के सवलत


राज्याच्या अर्थसंकल्पात (Maharashta Budget) उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक घोषणा केल्या आहेत. यामध्ये एसटीमधून प्रवास (ST News) करणाऱ्या महिलांना प्रवास तिकिट दरात 50 टक्के सवलत देणार असल्याचे जाहीर केले. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व महिलांना एसटी महामंडळामधे सरसकट 50 टक्के तिकीट दरामधे सवलत जाहीर केली. अखेर या आदेशाचा जीआर (GR) निघाला असून शुक्रवारपासून एसटी महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांना तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्यात आली आहे. एसटी महामंडळाच्या या योजनेला महिला सन्मान योजना म्हणून ओळखले जाणार आहे.  त्यामुळे कालपासून अनेक भागात एसटी प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या देखील वाढली आहे.