Nashik Shubhangi Patil : शुभांगी पाटील (shubhangi Patil) यांनी एकनाथ खडसेंचा (Eknath Khadse) आशीर्वाद घेतला असून शुभांगी पाटील यांना मुक्ताईनगर तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळेल. त्यांचे शैक्षणिक दृष्ट्या चांगले काम असल्यामुळे त्या विजय होतील असा विश्वास मला आहे, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी शुभांगी पाटील यांच्या भेटीनंतर दिली.
नाशिक (Nashik) पदवीधर मतदारसंघात शुभांगी पाटील यांच्या महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aaghadi) उमेदवार आहेत. प्रचार दरम्यान पाटील त्या मुक्ताईनगरला (Muktainagar) आल्या असता त्यांनी तालुक्यातील पदवीधरांशी गाठीभेटी घेत राष्ट्रवादीचे एकनाथ खडसेंची मुक्ताईनगरमध्ये निवासस्थानी आशीर्वाद घेतले. या भेटी प्रसंगी बोलतांना शुभांगी पाटील म्हणाल्या की, मी जळगाव जिल्ह्यातीलच आहे, खडसे हे आमचे महाविकास आघाडीचे मोठे नेते आहेत. माहेरवाशिनीला जे आशिर्वाद द्यायला पाहिजे, ते आशिर्वाद एकनाथ खडसेंनी दिले आहेत. यादरम्यान मुक्ताईनगरातील जे मतदार आहेत, त्यांना एकनाथ खडसेंनी सूचना केल्या आहेत. त्यानुसार ते सहकार्य करणार आहे. याबाबतची बैठकीत चर्चा झाल्याचंही शुभांगी पाटील यांनी सांगितलं.
यावेळी शुभांगी पाटील म्हणाल्या कि, काम करणाऱ्याला महाविकास आघाडीवर विश्वास आहे, जनतेवर विश्वास आहे. आपण अनेक असे काम केलेले तरी भविष्यात पेन्शनचा मुद्दा असेल जो अनेक वर्षापासून पेंडिंग असून हा प्रश्न अद्याप सुटला नाही, म्हणून जुनी पेन्शन योजना लागू करणार, अनुदान लागू करणार, पद भरती करणार याचबरोबर अनेक प्रश्न आहेत, अनेक विनावेतन ग्रंथपालांचे प्रश्न यापूर्वी सोडवलेले आहेत. पदवीधरांना शिष्यवृत्ती मिळवून दिलेली आहे, म्हणून काम करणारे संधी मिळणार आहे. कोण काय करतय, त्याच्याकडे लक्ष देत नसल्याचे त्या म्हणाल्या.
त्या पुढे म्हणाल्या कि, माहेरवाशीनीला जे आशीर्वाद दिले पाहिजे, ते आशीर्वाद खडसे यांनी दिलेले आहेत. पदवीधर मतदार संघासाठी महाविकास आघाडीचे आशीर्वाद आहेत. जळगाव जिल्ह्यातीलच मुलगी आहे, म्हणून पूर्ण विश्वास होता आणि आत्ता खडसे यांनी स्वतः प्रत्येकाला बोलावून घेत प्रत्येक कार्यकर्त्याला मदत करण्यास सांगितले. शिवाय खडसे यांच्या शब्दाला मान आहे, म्हणून प्रत्येक भावांनी सांगितलं की पदवीधरसाठी पाटील यांच्या विजयासाठी नक्कीच प्रयत्न करू, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
एकनाथ खडसे म्हणाले...
महाविकास आघाडीच्या उमेदवार पदवीधर मतदार संघातील उमेदवार शुभांगी ताई पाटील प्रचार दौऱ्याच्या निमित्त आज मुक्ताईनगरमध्ये आल्या. मुक्ताईनगर तालुक्यातील पदवीधरांचे त्यांनी संपर्क केला. त्याचबरोबर शैक्षणिक संस्थांचे प्राचार्य, शिक्षक यांच्याशी त्यांनी संपर्क साधून चर्चा केली. या चर्चेमधून त्यांनी आवाहन केले कि, मविआ उमेदवार म्हणून मतदान केलं पाहिजे, त्यांना फार चांगला प्रतिसाद या भागांमध्ये मिळेल अशी अपेक्षा आहे. शुभांगी पाटील यांचे कार्य हे यापूर्वी पण चांगले आहे, त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात, अन्य क्षेत्रामध्ये चांगलं काम केलेलं आहे.त्यामुळे त्या निश्चित विजयी होतील असा विश्वास असल्याचे खडसे म्हणाले.