Balasaheb Thorat : मुख्यमंत्री (Devendra Fadnavis) सगळे खाते संभाळत आहेत. तर उपमुख्यमंत्री त्यांचे सल्लागार म्हणून काम पाहत आहेत. उपमुख्यमंत्री चिट्ठी लिहून देतात कधी शर्ट ओढतात. त्यामुळे उपमुख्यमंत्री कधी त्यांनाच ते उडवतील कळणार नाही, अशी खोचक टीका काँग्रेसचे नेते बाळासाहेब (Balasaheb Thorat) थोरात यांनी केली आहे.
नाशिक (Nashik) शहरात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या अध्यक्षतेत नाशिक शहर व ग्रामीण तसेच मालेगाव शहर व ग्रामीण पदाधिकारी कार्यकर्त्याचा मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते. नाशिक ग्रामीणसह शहराच्या काँग्रेसची (Congress) ताकद पुन्हा एकदा उभी करण्यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. बाळासाहेब थोरात यांच्यासह जेष्ठ नेते नाना पाटोले हे देखील उपस्थित होते. यावेळी बाळासाहेब थोरात यांनी नव्या सरकारवर निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले कि, तुमची दिवाळी निवडणुकीतच जाणार आहे. काही निवडणूका दिवाळी पूर्वी होतील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
तसेच महाविकास आघाडी सरकार कसे पाडण्यात आले ते आपण बघितले. मात्र त्यानंतर नवे सरकार आले, या सरकारला एक महिना उलटूनही मंत्रिमंडळ विस्तार नाही. एकीकडे राज्यात पूर्वपरिस्थितीमुळे शेतकरी संकटात आहे. पिकांचे नौकांस, घरांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यांना पालकमंत्री नाही. शेतकऱ्याने कुणाकडे दाद मागायची असा सवाल थोरातांनी केला. शिवाय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीला असतात. मंत्रिमंडळ विस्तारामागे कोर्ट निर्णय लागत नाही हे कारण असून दुसरे म्हणजे जे 40-50 जण गेले. त्या सगळ्याना मंत्रीपद पाहिजे आहे. मुख्यमंत्री सगळे खाते संभाळत आहेत तर उपमुख्यमंत्री त्यांचे सल्लागार आहेत. कधी चिट्ठी लिहून देतात कधी शर्ट ओढतात, त्यामुळे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांना कधी त्यांना उडवतील कळणार नाही अशी बोचरी टीका यावेळी बाळासाहेब थोरात यांनी केली.
काँग्रेसच्या मेळाव्यात उपस्थित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र व राज्य सरकारवर टीका केली. केंद्र सरकारच्या अग्निपथ योवडिजनेमुळे लांच्या अगोदर मुलगा निवृत्त होणार असल्याचे दिवस देशातील जनतेला पाहायला मिळणार असल्याची बोचरी का करताना हेच अच्छे दिन आहेत का असावांना पटवले यांनी केला तसेच देशात व राज्यात महत्त्वाच्या विषयावरून जनतेचे लक्ष हटवण्यासाठी किडीचा वापर होत असून शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना झालेली अटक त्यांचाच भाग असल्याचे आरोप पटोले यांनी केला. तसेच सध्या देशात सगळीकडे महागाई वाढली आहे. आता महागाई विरोधात बोलणाऱ्या स्मृती इराणी कुठे आहेत? असा सवालही त्यांनी यावेळी केला.
जिल्हा काँग्रेस पक्षातर्फे स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवानिमित्त नऊ ते पंधरा ऑगस्ट दरम्यान आजादी की गौरव पदयात्रा काढण्यात येणार आहे. या पदयात्रेच्या माध्यमातून देशातील बिकट अर्थव्यवस्था सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन नाना पटोलें यांनी केले. यावेळी पद यात्रा म्हणजे आगामी नगरपरिषद नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांची तयारी म्हणून यात विद्यार्थी युवक महिला संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना सहभागी करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत काँग्रेस विचार पोहोचवण्याचे काम करण्याची सूचना पदाधिकाऱ्यांना केल्या.