Nashik News : नाशिकच्या गड किल्ले, पुरातन मंदिरांचे 'आई बाप' व्हा, दहा वर्षांसाठी मिळणार पालकत्व
Nashik News : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा स्थळे (Historical heritage sites) पुरातन मंदिरे यांचे जतन होण्यासाठी 28 राज्य संरक्षित मार्ग व स्थळे संवर्धनासाठी देण्यात येणार आहे.
Nashik News : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील गड किल्ले (Fort), ऐतिहासिक वारसा स्थळे (Historical heritage sites), पुरातन मंदिरे यांचे जतन होण्यासाठी, आपल्यापासून पुढच्या पिढीला या संस्कृतीची व ऐतिहासिक वारसा स्थळांची ओळख व्हावी यासाठी पुरातत्त्व खात्यातर्फे जिल्ह्यातील 28 राज्य संरक्षित मार्ग व स्थळे संवर्धनासाठी देण्यात येणार आहे. यासाठी विभागाने संस्था कंपन्याबाबत व्यक्तींनी या स्मारकाचे पालकत्व स्वीकारण्याचे आवाहन केले आहे. विशेष म्हणजे दहा वर्षांसाठी हे पालकत्व दिले जाणार आहे.
नाशिक शहरासह जिल्ह्यास ऐतिहासिक स्थळांचा वारसा लाभला आहे. यातील अनेक ऐतिहासिक स्थळे प्राचीन काळापासून आजतागायत शहरात पाहायला मिळतात. सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसांचे जतन करणे, राज्यसंरक्षित स्मारकांच्या जतन, देखभाल अधिक कामांसाठी सार्वजनिक सामाजिक सहभाग मिळवणे संस्था व्यक्ती यांना स्मारकांचे पालकत्व घेण्याकरता प्रोत्साहित करणे व खाजगी क्षेत्रातील कौशल्याचा ज्ञानाचा आणि अनुभवाचा जतन व दुरुस्ती करण्याकरिता उपयोग करून घेण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र वैभव राज्य संरक्षित स्मारक संगोपन योजना सुरू केली आहे. यात खाजगी कंपनी, विश्वस्त मंडळ, व्यक्ती यांना ज्ञान अनुभव कौशल्य भांडवल गुंतवून स्मारकांचे जतन करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. एखादे स्मारक या योजनेअंतर्गत घेतल्यानंतर त्याची देखभाल दुरुस्ती हे संबंधित संस्थेने करावयाच्या आहे.
जिल्ह्यातील स्मारक किल्ले मंदिराचे जतन संवर्धन होण्याच्या दृष्टीने संस्था कंपनी व्यक्तींना पालकत्व स्वीकारण्याचे आवाहन केले आहे. मंदिर व ज्या ठिकाणी नागरिकांची जास्त गर्दी होत असते त्या ठिकाणी मात्र तिकीट आकारणी करता येणार नाही अशा सूचना देण्यात येणार आहे अशी माहिती पुरातत्त्व विभागाच्या सहाय्यक संचालक आर्थी आहे यांनी दिली.
नाशिक जिल्ह्यातील 28 राज्यसंरक्षित स्मारक
अंकाई टंकाई किल्ला, अरनाथ जैन लेणी, इंद्रालेश्वर, कुशावर्त तीर्थ, गाळणा किल्ला, जैन लेणी, कालिका मंदिर चांदवड, त्रिभुवनेश्वर, तातोबा मंदिर, निळकंठेश्वर महादेव मंदिर, पार्श्वनाथ जैन लेणी, बल्लाळेश्वर मंदिर, मुक्तेश्वर महादेव मंदिर, मालेगाव किल्ला, महादेव मंदिर किल्ला, रंग महाल, राघवेश्वर महादेव मंदिर, रेणुकादेवी मंदिर, विष्णू मंदिर, वजेश्वर महादेव मंदिर, वटेश्वर महादेव मंदिर, सुंदर नारायण मंदिर, सरकार वाडा, साल्हेर किल्ला, स्वातंत्र्यवीर सावरकर जन्मस्थान, सावरकर वाडा परिसरातील विहीर, हतगड किल्ला, महादेव मंदिर.