एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Sanjay Raut : एकनाथ शिंदे हे भाजपचे मुख्यमंत्री, खासदार संजय राऊत यांचा टोला

Sanjay Raut : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे भाजपचे मुख्यमंत्री आहेत, अशी खरमरीत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर केली आहे.

Sanjay Raut : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे भाजपचे मुख्यमंत्री असून त्यासाठी ते दिल्ली दौऱ्यावर (Delhi) आहेत. शिंदेचे हायकमांड दिल्लीत असल्याने कॅबिनेट ठरविण्यासाठी ते गेले असावेत अशी खरमरीत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर केली आहे.

खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे नाशिक (Nashik) दौऱ्यावर आहेत. आज कार्यकर्ता मेळाव्यापुर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. ते यावेळी म्हणाले की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. कारण ते भाजपचे मुख्यमंत्री आहेत. आणि भाजपचे हायकमांड दिल्लीत असते. जर कोणी म्हणत असेल शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे, तर शिवसेनेचे हायकमांड हे महाराष्ट्रात आहे, मुंबईत आहे, मातोश्रीवर असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

ते पुढे म्हणाले की मंत्रिमंडळ ठरविण्यासाठी शिवसेनेचा मुख्यमंत्री कधी दिल्लीत जात नाही, गेला नाही.  मात्र आता राज्यात भाजपचे सरकार असल्याने सर्व गोष्टी दिल्लीवरूनच होतील. त्यामुळे थोडं थांबा सगळे मुखवटे गळून पडतील, असे सूचक विधानही त्यांनी यावेळी केले.

मराठी माणसावर अन्याय वाढला
आता एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या कडून राज्याच्या अपेक्षा आहेत. सध्या सीमा भागात पुन्हा एकदा अत्याचार वाढण्यास सुरुवात झाली आहे. या संदर्भातील बातम्या देखील येऊ लागल्या आहेत. आता महाराष्ट्रात मुख्यमंत्री भाजपचे आहेत, बेळगाव कर्नाटक सीमा भागावरील मराठी माणसांवर अत्याचार होत आहेत. हे प्रकरण सध्या कोर्टात आहे, मुख्यमंत्री भाजपचे असल्याने त्यांनी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे हा प्रदेश केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करावा अशी मागणी मांडायला हवी आणि तो निर्णय घेऊन महाराष्ट्रात यायला हवं, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी बोलून दाखवली.

मुंबईचे तीन तुकडे!
राज्यात भाजप प्रणित सरकार आहे. मात्र एकेकाळचे शिवसैनिक असलेले एकनाथ शिंदे यांनी मुंबईकडे लक्ष द्यावे. मुंबईचे उद्योग, ऑफिसेस सगळं पळवल जात आहे. शिवाय मुंबईचे तीन तुकडे करण्याचा यांचा मानस आहे, त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याकडे लक्ष द्यायला हवे, असेही संजय राऊत म्हणाले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर, शनिवार 30 नोव्हेंबर 2024
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर, शनिवार 30 नोव्हेंबर 2024
Shardul Thakur : कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
भुजबळांविरोधात निवडणूक लढलेल्या उमेदवाराच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; माणिकराव शिंदेंनी घेतला मोठा निर्णय
भुजबळांविरोधात निवडणूक लढलेल्या उमेदवाराच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; माणिकराव शिंदेंनी घेतला मोठा निर्णय
Amshya Padvi : आमश्या पाडवी यांच्यावर महिलेचा विनयभंगाचा आरोप, अक्कलकुव्यात भाजप अन् शिंदे  गटात राडा
आमश्या पाडवी यांच्यावर महिलेचा विनयभंगाचा आरोप, अक्कलकुव्यात भाजप अन् शिंदे गटात राडा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Baba Adhav : बाबा आढाव यांनी उपोषण सोडलं, फुले वाड्यात होतं आत्मक्लेश उपोषणUddhav Thckeray Meet Dr baba Adhav : उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर बाबा आढाव यांनी पोषण मागे घेतलंAjit Pawar Meet Baba Adhav : अजित पवार यांनी घेतली बाबा आढाव यांची भेट, काय आश्वासन दिलं? #abpमाझाBaba Adhav On Vidhan Sabha | या प्रकरणी शोध घ्यायला पाहिजे, बाबा आढाव यांची मागणी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर, शनिवार 30 नोव्हेंबर 2024
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर, शनिवार 30 नोव्हेंबर 2024
Shardul Thakur : कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
भुजबळांविरोधात निवडणूक लढलेल्या उमेदवाराच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; माणिकराव शिंदेंनी घेतला मोठा निर्णय
भुजबळांविरोधात निवडणूक लढलेल्या उमेदवाराच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; माणिकराव शिंदेंनी घेतला मोठा निर्णय
Amshya Padvi : आमश्या पाडवी यांच्यावर महिलेचा विनयभंगाचा आरोप, अक्कलकुव्यात भाजप अन् शिंदे  गटात राडा
आमश्या पाडवी यांच्यावर महिलेचा विनयभंगाचा आरोप, अक्कलकुव्यात भाजप अन् शिंदे गटात राडा
Australia Social Media Ban : तर 275 कोटींचा दंड! जगाला जमलं नाही ते ऑस्ट्रेलियानं करून दाखवलं; 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर नो एन्ट्री
तर 275 कोटींचा दंड! जगाला जमलं नाही ते ऑस्ट्रेलियानं करून दाखवलं; 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर नो एन्ट्री
राजभवनाऐवजी अमावस्येला पूजा-अर्चा करण्यासाठी शेतात गेले; पुण्यातून ठाकरेंचा टोला, आढाव यांचं उपोषण सुटलं
राजभवनाऐवजी अमावस्येला पूजा-अर्चा करण्यासाठी शेतात गेले; पुण्यातून ठाकरेंचा टोला, आढाव यांचं उपोषण सुटलं
संतप्त तरुणाची जेसीबी घेऊन आलेल्या तहसीलदारांना मारहाण, व्हिडिओ व्हायरल; गुन्हा दाखल
संतप्त तरुणाची जेसीबी घेऊन आलेल्या तहसीलदारांना मारहाण, व्हिडिओ व्हायरल; गुन्हा दाखल
पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव अन् दुसरी सुरु होण्यापूर्वीच बसला तगडा झटका; आरसीबीकडून मेगा लिलावात याच खेळाडूवर 12.5 कोटींचा खर्च!
पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव अन् दुसरी सुरु होण्यापूर्वीच बसला तगडा झटका; आरसीबीकडून मेगा लिलावात याच खेळाडूवर 12.5 कोटींचा खर्च!
Embed widget