(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Congress Agitation : नाशिक काँग्रेस आंदोलन : सर्वसामान्यांच्या खिशातून पैसे काढून घेण्याचं काम चाललंय : बाळासाहेब थोरात
Nashik Congress Agitation : केंद्र सरकारच्या (Central Goverment) विरोधात नाशिक (Nashik) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले जात आहे.
Nashik Congress Agitation : राज्यभरात महागाईने सर्वसामान्यांचे जगणे महाग झाले असून जीवनावश्यक वस्तूंवर देखील जीएसटी (GST) लावल्याने महागाईचा टोम वाढत चाललेला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशातून पैसे काढून घेण्याचं काम सुरु असल्याची टीका बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केली आहे. केंद्र सरकारच्या (Central Goverment) विरोधात राज्यभरात आंदोलने सुरु असून उत्तर महाराष्ट्र विभागाच्या वतीने नाशिक (Nashik) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले जात आहे. या आंदोलनात उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेसचे सर्वच नेते उपस्थित आहेत असून सोनीया गांधी आणि राहुल गांधी यांच्याविरुद्ध ईडीच्या माध्यमातून कारवाई करण्यात येत आहे, या संदर्भात हे आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी ते बोलत होते.
नॅशनल हेराल्ड (national Herald) प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Soniya Gandhi) यांना समन्स बजावलेले आहे. दरम्यान आज सोनिया गांधी यांची ईडीकडून (ED) चौकशी करण्यात येत आहे. या चौकशीच्या निषेधार्थ काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यासह देशभरात काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी कार्यकर्ते रसत्यावर उतरत ईडी आणि मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी करताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर आज नाशिकमध्ये काँग्रेसचे आंदोलन सुरु आहे.
यावेळी बाळासाहेब थोरात म्हणाले कि, नॅशनल हेराल्ड स्वातंत्र्य लढ्यातील अशा प्रकारचं वृत्तपत्र आहे की ज्यांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी योगदान दिलेले आहे. कोणतेही कारण नसताना विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचे काम भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून होत आहे. त्यामध्ये सोनिया गांधीपर्यंत ते पोहोचलेले असून सोन्या गांधी यांची तब्येत चांगली नाही, मध्यंतरी रुग्णालयात दाखल होत्या. या सगळ्या परिस्थितीमध्ये काही विचार न करता अत्यंत क्रूरपणे विरोधी पक्षाच्या नेत्यांचा त्रास द्यायचा आणि त्याच्यातून विरोधी पक्षाचा आवाज दाबायचं हे काम आता सध्या चालले असल्याचे थोरात यावेळी म्हणाले.
महागाई, ओबीसी आरक्षण, राज्य सरकार म्हणाले....
बाळासाहेब थोरात महागाई विषयी म्हणाले कि, एका बाजूला प्रचंड महागाई वाढलेली सर्वसामान्य जीवन कठीण झाले. पेट्रोल वाढलं, डिझेल वाढलं, गॅस वाढला आता तर जीवनावश्यक वस्तूला सुद्धा जीएसटी लावला. दुधाच्या पदार्थांना जीएसटी लावलेला आहे. त्यामुळे केंद्र सरकार सर्वसामान्यांच्या खिशातून पैसा काढून घेण्याचं काम करत आहे.
राज्यात दोघांचे सरकार
सध्या महाराष्ट्र राज्य बिकट परिस्थितीमधून जात असून राज्यात दोघांचे सरकार आहे. राज्यभरात पुरपरिस्थितीमुळे अत्यंत कठीण परिस्थितीला संपूर्ण महाराष्ट्र सामोरा गेलाय, त्यामध्ये शंभर पेक्षा जास्त बळी गेली आहेत. हे सरकार बनवू शकत नाही, मंत्र्यांना शपथ देऊ शकत नाही, आज गोंधळाची अवस्था संपूर्ण राज्यामध्ये निर्माण झालेली आहे, हे नाकारता येत नाही. यामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने सत्य जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचा परिणाम असा आहे की लवकरच सर्वोच्च न्यायालय निर्णय देईल.
ओबीसी आरक्षण
महाविकास सरकारने चांगलं नियोजन केलं. आम्ही बांठिया आयोग नेमून अहवाल तयार केला. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने योग्य निकाल दिला. ओबीसीच्या (OBC Reservation) हिताचा निर्णय दिलेला आहे. त्यांचा हक्क मिळून आम्ही दिलेला आहे. यामध्ये क्रेडिट जे आहे महाविकास आघाडीला असून भुजबळांच्या चळवळीला श्रेय असल्याचे त्यांनी सांगितले