Corona Vaccination : कोरोनाच्या (Corona) काळात  लसीकरण सुरु असताना देशभरात कोविशील्ड (Covishiled) आणि कोवक्सीन आशा दोन लसींचा वापर करण्यात आला.  दरम्यान कोविशील्ड लस घेतल्यानंतर एका विद्यार्थिनीचा मृत्यू (Death) झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर या प्रकरणी वडिलांनी लस टोचल्याने आपल्या मुलीचा मृत्यू झाला, असा आरोप करत याचिका दाखल केली होती. या याचिकेची मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High court) दखल घेतली असून याप्रकरणी प्रख्यात उद्योजक बिल गेट्स (Bill Gates) आणि लस निर्मिती करणाऱ्या पुनावाला (Adar Poonawala) यांना नोटीस बजावण्यात आली आहे. राज्य सरकारलाही नोटीस बनवण्यात आली असून याप्रकरणी नुकसान भरपाई म्हणून सिरम इन्स्टिट्यूटने 1000 कोटींची रक्कम द्यावी अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. 


नाशिकमध्ये (Nashik) वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या डॉक्टर स्नेहल लुनावत (Snehal Lunawat) यांनी गेल्या वर्षी जानेवारीच्या सुमारास कोविशील्ड लस घेतली होती. त्यानंतर काही दिवसांनी त्यांची प्रकृती ढासळू लागल्याने मार्चच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. लेकीच्या मृत्यूप्रकरणी वडील दिलीप लुनावत यांनी न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयात लुनावत यांनी केलेल्या याचिकेची दखल घेतली असून अदर पुन्हा वाला यांच्यासह बिल गेट्सना प्रतिवादी ठरवले. न्यायधीश गंगापूरवाला आणि माधव जामदार यांच्या खंडपीठाने ही नोटीस बजावली आहे.


दरम्यान मार्च 2021 मध्ये स्नेहल लुनावत यांच्या मृत्युनंतर जागतिक आरोग्य संघटनेने देखील या घटनेची गंभीर दखल घेतली होती. नाशिकच्या एका वैद्यकीय महाविद्यालयात snehal लुनावत या शिक्षण घेत होत्या. त्यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु असल्याने लसीकरण सुरु होते. त्यावेळी स्नेहल लुनावत यांनी कोविशील्ड लस घेतल्यानंतर घेतली होती. मात्र काही दिवसानंतर त्यांना त्रास जाणवू लागल्याने मार्च 2021  ला त्यांचे निधन झाले. यानंतर वडील दिलीप लुनावत यांनी आक्षेप घेत माझ्या मुलीचा मृत्यू हा लसीमुळे झाल्याचा आरोप करत त्यांनी या संदर्भात फेब्रुवारी 2022 मध्ये मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली. यामध्ये त्यांनी 1000 कोटी रुपयांची भरपाईची मागणी संबंधीत  संस्था, व्यक्तीकडे केली होती. 


या याचिकेची मुंबई हार्ट कोर्टाकडून दखल घेण्यात आली असून संबंधित संस्थां, व्यक्तींना नोटीस बजावण्यात आले आहेत. यामध्ये भारत सरकार, सिरम इन्स्टिट्यूटचे संचालक आणि डीसीजीआय प्रमुख आणि संबंधित इतर काही जणांचा समावेश आहे. न्यायमूर्ती एस.व्ही गंगापूर वाला आणि न्यायमूर्ती महादेव जामदार यांच्या खंडपीठाने 26 ऑगस्ट रोजी याचिकेवर नोटीस जारी केली होती. ज्यामध्ये बिल गेटच्या वतीने ऍड स्मिता ठाकूर यांनी नोटीस स्वीकारली होती. 


नेमक काय म्हटलंय याचिकेत ... 
दरम्यान याचिकाकर्त्याने याचिकेतदावा केला आहे की त्यांची मुलगी स्नेहल लुनावत ही नाशिकमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होती. लस देण्यापूर्वी तिला खात्री देण्यात आली की कोविशील्ड लस पूर्णपणे सुरक्षित असून मानवी शरीराला यामुळे कोणताही धोका नही. आरोग्य कर्मचारी असल्याने तिला महाविद्यालयातच लस घेणे भाग पाडले. परंतु त्या लशीच्या दुष्परिणांमुळे एक मार्च 2021 रोजी स्नेहल लुनावत यांचा मृत्यू झाला असा दावा स्नेहल लुनावत यांचे वडील दिलीप  लुनावत यांनी याचिकेमध्ये केला आहे. याचिकेत पुढे म्हटले आहे की भारताचे औषध नियंत्रण जनरल आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस च्या संचालकांनी लस सुरक्षित असल्याची खोटी आश्वासने देत कोविशील्ड कार्यान्वित केली. राज्य सरकारने याची पुरेपूर पडताळणी न करताच ती आरोग्य सेवक आणि कर्मचाऱ्यांना देण्यात आली. या लसीचा दुष्परिणामामुळे झालेल्या मृत्यूबाबत अचूक माहिती लपवल्याच्या आरोपाखाली त्यांनी गुगल, युट्युब, मेटा   इत्यादी सोशल मीडिया कंपन्यांवर योग्य कारवाई करण्याची मागणी केंद्र सरकारकडे याचिकेच्या माध्यमातून केली आहे