Nashik Ganeshotsav : सलग तिसऱ्या दिवशी पाऊस कोसळल्याने शहरातील अनेक गणेश मंडळांची (Ganesh Mandal) देखाव्यांची कामे रखडली आहेत. तर भक्तांचाही हिरमोड झाला आहे. पुढील काही दिवस पावसाने विश्रांती घ्यावी आणि गणेशोत्सव (Ganeshotsav) उत्साहात साजरा करू द्यावा, असेच बाप्पाकडे साकडे मंडळ पदाधिकाऱ्यांकडून घातले जाते आहे.


लाडक्या गणरायाचे बुधवारी वाजत गाजत मोठ्या जल्लोषात भाविकांनी स्वागत केले. गणेशोत्सवामुळे शहरात सर्वत्र चैतन्याचे वातावरण असून सार्वजनिक मंडळाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह देखील द्विगुणीत झाला आहे. मात्र अद्यापही अनेक गणेश मंडळांचा सदस्य सजावटीचे काम सुरू आहे तर दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे या सजावटीच्या कामाला खोळंबा घातला आहे. पावसामुळे या कार्यात काहीसे विघ्न आल्याचे पाहायला मिळाले. 


गणेशोत्सव दोन वर्षानंतर निर्बंध मुक्त साजरा होत असल्याने सार्वजनिक मंडळासह भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यातच शहरात यांना महापालिकेच्या निवडणुका असल्याने इच्छुकांकडून मंडळांना बळ दिले जात आहे. बहुतांश इच्छुकांनी स्वतःचे मंडळ स्थापन केले आहे सहकार्य मिळाल्याने साहजिकच मंडळांनी देखील आकर्षक सजावट आणि आरास साकारण्याचे काम सुरू केले आहे. बुधवारी सकाळपर्यंत मंडप आणि स्टेज उभारणीनंतर गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली असून बहुतांश मंडळांनी विद्युत रोषण्याचे काम पूर्ण केले आहे. मात्र मोठी आरास आणि देखावांचे काम अद्याप अपूर्ण असल्याने गुरुवारी सकाळपासून कार्यकर्त्यांनी हे काम प्राधान्याने हाती घेतले होते. मात्र दुपारनंतर पावसाला सुरुवात झाली. रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरू असल्याने नाईलाजाने हे काम थांबवावे लागले. त्यामुळे अद्यापही अनेक गणेश मंडळांच्या देखाव्याचे काम अपूर्ण आहे. 


पाऊस थांबण्यासाठी बाप्पांना साकडे 
तब्बल दोन वर्षानंतर गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असताना दुसरीकडे पावसाने शहरात हजेरी लावली आहे गेल्या दोन दिवसांपासून सायंकाळच्या सुमारास पाऊस हजेरी लावत असल्याने नाशिककर घराबाहेर पडण्याचे टाळत आहेत. एकीकडे गणेशोत्सव सुरू असताना देखावे पाहण्याची हाऊस नाशिककरांना मात्र भागवता येत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे अनेकजण पाऊस थांबावा असे साकडे देखील बाप्पांना घालत आहेत. विकेंड अवघ्या एका दिवसात वाल्यांनी शनिवारी व रविवार देखावे विद्युत रोशनी यांची आरास पाहण्यासाठी नाशिककर भाविकांची मोठी गर्दी होणार असल्याने आज रात्री उशिरापर्यंत हे काम पूर्ण करावे लागणार आहे. 


शहरात गणेशोत्सवाचा उत्साह 
तब्बल दोन वर्षानंतर गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असल्याने शहरात चैतन्याचे वातावरण आहे. सार्वजनिक गणेश मंडळासह यंदा घरगुती मंडळाची संख्या देखील अधिक आहे. तसेच दीड दिवसांच्या गणपतीला देखील नाशिककरांनी साश्रू नयनांनी निरोप दिला. त्यामुळे यंदाचा बाप्पाचा गणेशोत्सव  नाशिककर आनंद घेत आहेत.