Akole Nilwande Dam : आधी पुनर्वसनानंतर धरण हे ब्रीद वाक्य वापरत निळवंडे धरणाचे (Nilwande Dam) काम पूर्ण झाले आणि आता कालव्यांची कामे सुद्धा पूर्ण झाली असून दुष्काळी भागाला लवकरच पाणी मिळणार असून 31 मे ला उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते कालव्यात पाणी सोडून पहिली चाचणी केली जाणार आहे. काही दिवसापूर्वी बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी आधी पाणी द्या, उद्घाटन नंतर करा, असे पत्र राज्य सरकारला दिले होते. त्यानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी कालव्यांची पाहणी केली असून 31 मे रोजी पाणी सोडणार असल्याची घोषणा केली. यामुळे विखे विरुद्ध थोरात अशी श्रेयवादाची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली असल्याचे चित्र आहे.
अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, राहाता, राहुरी आणी कोपरगावसह नाशिक (Nashik) जिल्ह्यातील 182 गावांना वरदान ठरणारे निळवंडे धरणाच्या मुख्य भिंतीचे काम 2011 साली पूर्ण झाले. आणि त्यानंतर धरणात आठ टिएमसी पाणीही साठवायला सुरूवात झाली. मात्र ज्या दुष्काळी भागासाठी धरण आणि कालवे बांधण्यात आले. त्यांना अजून एक थेंबही पाणी पोहचले नव्हते. मात्र धरणाच्या डाव्या कालव्याचे काम पूर्ण झाले असून 31 मे रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते कालव्यात पाणी सोडून पहिली चाचणी घेण्यात येणार आहे. पालकमंत्री विखे पाटील (Radhakrushna Vikhe Patil) यांनी कालव्यांच्या कामाची पाहणी करत ही घोषणा केली आहे.
कोणतंही पुण्याच काम करायला भाग्य लागत. ते आमच्या नशिबात आहे, हा आमचा दोष नाही. जे वाद आतापर्यंत झाले, ते कालव्याच्या पाण्यात सोडून देऊ असा टोला सुद्धा विखे पाटील यांनी थोरात याना यावेळी लगावला आहे. अहमदनगर जिल्ह्याला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरण कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी येत्या 31 मे रोजी घेण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर आज नेते मधुकरराव पिचड यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीस महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी धरणग्रस्तांशी संवाद साधला. तसेच त्यांनी धरण आणि कालव्यांची व्यवस्थितरित्या पाहणी करून कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
उदघाटन सोहळा कधीही करा, आधी पाणी द्या...
दरम्यान काही दिवसापूर्वी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहित पाणी सोडण्याची मागणी केली होती..आज धरणात 10 टीमसी पाणी असताना ते वाया जाण्यात अर्थ नाही. त्यामुळे कालव्यात पाणी सोडण्याची मागणी करत थोरात यांनी उदघाटन सोहळा कधीही करा, आधी पाणी द्या अशी मागणी केली होती. चार महिन्यापासून आम्ही उदघाटन करणार अस ऐकतोय.. पत्र द्यावे लागले, हे योग्य नाही. धरण आम्ही पूर्ण केलं हे सगळ्याना माहीत आहे. नशिबाने पाणी सोडण्याची संधी तुम्हाला मिळाली, त्याचा उपयोग केला पाहिजे, असा टोला थोरात यांनी विखे यांना पाहणी नंतर लगावला आहे.