Nashik Rain : नाशिकसह (Nashik) जिल्ह्याला दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. अशातच मनमाडकरांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. मनमाड शहराला पाणीपुरवठा करणारे वाघदर्डी धरणाने तळ गाठल्याने मनमाड शहराला तब्बल 22 दिवसांनी पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यत मनमाड (Manmad) शहरवासियांवर पाणीटंचाईची वेळ आली आहे.
नाशिक शहरासह जिल्ह्यातील काही भाग आजही दमदार पावसाची (Rain Update) वाट पाहत आहे. पावसाचे दोन महिने उलटले असले तरीही अद्याप जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे अनेक धरणांची पाणी पातळी जैसे थे आहे. अशातच मनमाड परिसरात देखील पावसाने पाठ फिरवली असल्याने वाघदर्डी धरण साठ्यात कमालीची घट होऊन धरणाने तळ गाठला आहे. त्यामुळे मनमाडकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. परिणामी मनमाड जशी उन्हाळ्यात परिस्थिती असते, तशीच काहीशी परिस्थिती भर पावसाळ्यात ओढावल्याचे चित्र आहे. तब्बल 22 दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्याचे वास्तव आहे.
नाशिक जिल्ह्यात (Nashik District Rain) अद्यापही म्हणावा तसा पाऊस पडला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील वाघदर्डी धरणाने (Waghdardi Dam) गाठला तळ गाठला आहे. धरणाची पातळी खाली गेल्यामुळे मनमाड शहराला पावसाळ्यातही 22 दिवसांनी पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती आहे. पावसाळा सुरु होऊन तब्बल दीड महिना उलटून गेला तरी अजूनही नाशिकच्या ग्रामीण भागात हवा तसा पाऊस नाही. चांगला पाऊस नसल्याने जिल्ह्यातील धरणांच्या पाणीपातळीने तळ गाठला आहे. तसेच धरणांचा तालुका असलेल्या नांदगाव (Nandgaon) परिसरातील धरण तळ गाठू लागले आहे. दरम्यान नाशिक जिल्ह्यात हवामान विभागानुसार पुढील पाच दिवस सुद्धा कोणताही अलर्ट नसल्याचे सांगण्यात आले असून पावसाची वाट पहावी लागणार असल्याची चिन्हे आहेत.
पावसाची प्रतीक्षा कायम
नाशिकच्या मनमाड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघदर्डी धरणाने सध्या तळ गाठला आहे. वाघदर्डी धरणावरुन मनमाड शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. पाऊस नसल्याने पाणीसाठ्यात वाढ होण्याऐवजी घट होऊ लागली आहे. त्यामुळे भर पावळ्यातही धरणाने तळ गाठला असल्याने तब्बल 22 दिवसानंतर पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आगामी दिवसांत मनमाडकरांसह नाशिककरांना देखील दमदार पाऊसाची आवश्यकता असून सर्वांचेच डोळे आकाशाकडे लागल्याचे चित्र आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे, पाऊस पडेल असे आशादायी चित्र निर्माण होते. मात्र प्रत्येक वेळी पाऊस हुलकावणी देत असून आज तर सूर्यदर्शन होत असल्याने पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
इतर संबंधित बातम्या :