Panchavati Express: नाशिक-मुंबई प्रवास होणार आरामदायी, पंचवटी एक्सप्रेसचे 11 कोच बदलले
नाशिक जिल्ह्याची जीवन वाहिनी समजल्या जाणाऱ्या मनमाड - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पंचवटी एक्स्प्रेसचे 11 कोच बदलले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App11 कोच बदलल्याने प्रवाशांचा प्रवास आता आरामदायी झाला आहे.
जिल्ह्यातील चाकरमान्यांची प्रमुख भिस्त असणारी रेल्वेगाडी म्हणून मनमाड-नाशिक-मुंबई पंचवटी एक्स्प्रेसची ओळख आहे.
नोकरदार, व्यावसायिक, विद्यार्थी, रुग्ण, पर्यटक आदींसाठी ही सोयीची गाडी आहे.
नाशिक जिल्ह्यातील प्रवाशांसाठी पंचवटी एक्स्प्रेस ही सोयीची आहे.
मनमाड ते नाशिक व नाशिक ते मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे.
पंचवटी एक्स्प्रेसला 2018 पासून एलएचबी रेक जोडण्यात आले होते.
मात्र त्यांची आसन व्यवस्था बसण्यासाठी योग्य व पुरेशी जागा नसल्याने प्रवाशांना पाठदुखी आणि मानदुखी या सारख्या समस्या सुरू झाल्या
आता रेल्वे प्रशासनाने पंचवटी एक्स्प्रेसचे 11 कोच बदलले आहे.
आसन व्यवस्थाही योग्य झाल्याने प्रवास सुखकर होणार असल्याने प्रवाशी वर्गाने समाधान व्यक्त केले आहे..