Nashik Student IPL : सध्या सगळीकडे आयपीएलचा (IPL 2023) थरार पाहायला मिळत असून दिवसाकाठी आयपीएल लोकप्रियता वाढत आहे. शहरी भागासह ग्रामीण भागातही ही लोकप्रियता वाढत असून हल्ली मुलांपेक्षाही मुलींना देखील क्रिकेटचे वेड दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिक (Nashik) जिल्ह्यातील गावखेड्यातील दीडशे विद्यार्थिनींना थेट मैदानातून आयपीएल (IPL Live) बघण्याची संधी मिळणार आहे. 


आयपीएल म्हटलं कि क्रिकेटविश्वातील (Cricket) सर्वात मोठा खेळाचा उत्सव मानला जातो. क्रिकेटप्रेमी वर्षभरापासून या उत्सवाची आतुरतेने वाट बघत असतात. आयपीएल मध्ये असलेल्या आठ संघांपैकी अनेक संघाचे चाहते आहेत. जसे कि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians), चेन्नई सुपरकिंग्स, आरसीबी (RCB) आदी संघांना खूप फॅन फोल्लोविंग असल्याचे बोलले जाते. शहरी, ग्रामीण भागात आयपीएल सामने बघण्यासाठी अनेक अँप देखील उपलब्ध आहेत. त्यामुळे अनेकजण आयपीएल ऑनलाईन पाहत असतो. मात्र, स्टेडियममध्ये बसून मॅच बघण्याची मजा काही वेगळीच असते. हीच संधी नाशिकच्या ग्रामीण भागातील मुलींना मिळणार आहे. 


आज ग्रामीण भागात क्रिकेटचे फॅड खूप आहे. उन्हाळा, हिवाळा या दोन्ही ऋतूत टूर्नामेंट होत असतात. मात्र यात तरुणांची संख्या अधिक असते. मुली मात्र फारशा दिसत नाहीत. मात्र हल्ली अनेक मुलींचा कल हा क्रिकेटकडे असल्याचे दिसून येत आहे. मागील काही वर्षात इंडियन वूमन क्रिकेट टीम फॉर्मात असल्याने अनेक मुलींची आवड क्रिकेट बनली आहे. त्यात ग्रामीण  भागातील मुलींची संख्या लक्षणीय आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील अतिदुर्गम आणि आदिवासी पाड्यावरील क्रिकेटची आवड असणाऱ्या विद्यार्थिनींना इंडियन प्रीमियर लीगचा प्रत्यक्ष सामना बघण्याची संधी स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून उपलब्ध होत आहे. 


इगतपुरी आणि दिंडोरीतील 150 विद्यार्थिनींना संधी 


इगतपुरी व दिंडोरी तालुक्यातील दीडशेहून अधिक विद्यार्थिनी 16 एप्रिल ला मुंबईतील वानखेडे स्टेडियम सामना बघायला जाणार आहेत. इगतपुरी आणि दिंडोरी तालुक्यातला आश्रम शाळा व विद्यालयाशी संपर्क साधला. त्या शाळांमधील खेळाडू आणि क्रिकेटची आवड असणाऱ्या विद्यार्थिनींची निवड करण्यासाठी शिक्षकांना सांगण्यात आले त्यानुसार तिन्ही शाळांमधून प्रत्येकी 50 विद्यार्थींची निवड करण्यात आली. यामध्ये दिंडोरी तालुक्यातील खुशिराज प्राथमिक आश्रम शाळा, इगतपुरी तालुक्यातील ज्ञानदा विद्यालय मोडाळे आणि महात्मा गांधी विद्यालय इगतपुरी नजीकच्या आदिवासी पाड्यावरील विद्यार्थी मुंबई येथील आयपीएल सामना थेट स्क्रीनचा आनंद घेणार आहेत. 


आयपीएलचा सामना प्रत्यक्ष बघणार 


नाशिक येथून मुंबईकडे प्रस्थान करण्यापूर्वी या प्रवासाचा छोटेखानी स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्येच नाही तर त्यांच्या पालकांमध्येही आनंद व्यक्त करण्यात येत आहे. या निमित्ताने त्या मुंबईला देखील बघणार असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. सर्वाधिक लोकप्रिय ठरत असलेल्या आणि शालेय विद्यार्थी युवा वर्गाचे पसंती ठरत असेल इंडियन प्रीमियर लीगचे सामने प्रत्यक्ष बघण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे.