(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Pune Election : पुण्यात रवींद्र धंगेकरांचा विजय, नाशिकमध्ये पेढे वाटले, फटाके फोडले!
Nashik Pune Election : रवींद्र धंगेकरांच्या विजयामुळे नाशिकमध्ये काँग्रेस कार्यालयासमोर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.
Nashik Pune Election : काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी कसबा येथील विधानसभा पोटनिवडणुकीत (Pune Bypoll Election) विजयी गुलाल उधळला. यामुळे नाशिकमध्ये काँग्रेस कार्यालयासमोर काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. यावेळी महाविकास आघाडीतील पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरे गटाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते देखील या जल्लोष सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले.
गेल्या 28 वर्षांपासून भाजपचा (BJP) गड मानल्या जाणाऱ्या कसबा मतदारसंघात भाजपचा दारुण पराभव झाला आहे. कसबा मतदारसंघात (Kasaba Assembly) काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर विजयी झाले आहेत. रवींद्र धनगर हे 11 हजार 40 मतांनी जिंकले आहेत. त्यामुळे त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपचे हेमंत रासने यांना पराभवाची धूळ चारली आहे. त्यामुळे राज्यभरातच महाविकास आघाडीकडून मोठ्या प्रमाणावर जल्लोष साजरा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये (Nashik) देखील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात पेढे वाटून, फटाके फोडून रवींद्र धंगेकर यांच्या विजयाचा जल्लोष साजरा केला.
पुण्यातील कसबा आणि चिंचवड मतदार संघातील दोन्ही पोटनिवडणूक निवडणुकांकडे राज्याचा लक्ष लागलं होतं. कसबा पोटनिवडणुकीत राज्यातीलच नव्हे देशातील मंत्र्यांनी या ठिकाणी उपस्थिती लावून भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा प्रचार दौरा केला होता. मात्र हे प्रचार दौरे सपशेल अयशस्वी ठरल्याचे चित्र आज निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट झाले. पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघात महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर यांचा विजय झाला आहे. नाशिकमध्ये महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची अतिष बाजी करत एकमेकांना पेढे भरवत जोरदार जल्लोष केला.
गेल्या 28 वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला असलेला पुण्यातील मतदारसंघाला अखेर महाविकास आघाडीच्या रवींद्र धंगेकर यांनी सुरुंग लावत विजय संपादन केला आहे. त्यामुळे भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे. भाजपचे हेमंत रासने आणि महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर यांच्यामध्ये चुरशीशी लढत झाली. यात रवींद्र धंगेकर यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला. ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने मोठा कस लावला होता. गेल्या अनेक दिवसांपासून भाजपचे बडे नेते या ठिकाणी या मांडून होते. मात्र अखेर भाजपला पराभव स्वीकारावा लागला आहे.
कोण आहेत रवींद्र धंगेकर?
2009 च्या विधानसभा निवडणुकीत कसब्यातून निवडून आलेले भाजपचे तत्कालीन उमेदवार गिरीश बापट यांच्याविरोधात त्यांचा अल्पशा फरकाने पराभव झाला होता. धंगेकर तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत होते. धंगेकर हे राज ठाकरे यांचे विश्वासू राहिले आहेत. रविंद्र धंगेकर हे पाच वेळा नगरसेवक असून त्यांनी पुणे महानगरपालिकेत शिवसेना आणि मनसेचे दोन वेळा प्रतिनिधित्व केलं आहे. 2017 मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि काँग्रेस समर्थित अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आले. मनसेमध्ये असताना धंगेकर हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे विश्वासू होते.