Nashik Jansthan Puraskar : साहित्य क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा जनस्थान पुरस्कार (Jansthan Puraskar) 2023 हा जेष्ठ लेखिका आशा बगे (Asha Bage) यांना प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांच्या प्रमुख उपस्थितीत, प्रतिष्ठानचे अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या हस्ते दिला गेला. एक लाख रुपये रोख, मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. 


दर दोन वर्षांनी जनस्थान पुरस्कार जाहीर करण्यात येतो. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या (Kusumagraj Pratisthan) वतीने 2023 चा जनस्थान पुरस्कार (Jansthan Award) ज्येष्ठ लेखिका आशा बगे यांना जाहीर करण्यात आला होता. नाशिक शहरातील महाकवी कालिदास कला मंदिरात पार पडलेल्या या सोहळ्याला साहित्यप्रेमी नाशिककर मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुरस्कार मिळताच मी कृतज्ञ झाले अशी पहिली प्रतिक्रिया त्यांनी देत प्रतिष्ठानचे आभार मानले. आशा बगे यावेळी म्हणाल्या कि, ज्ञानेश्वरी सर्व काव्यांचे मूळ आहे तर माणूसपणाला जपणारे कुसुमाग्रज होते. स्त्रियांच्या कवितांमुळे अनेक बदल झाले असे त्यांनी आपल्या भाषणात बोलून दाखवत कुसुमाग्रजांच्या 'विजयासाठी कधी नव्हतीच कविता माझी' ही कविता म्हणून त्यांनी आपल्या भाषणाचा शेवट केला.


नाशिक शहरातील कालिदास कलामंदिरात कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार प्रदान करण्यात आला. मानपत्र, सन्मानचिन्ह आणि एक लाख रुपये रोख, असे या पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी बोलताना आशा बगे यांनी नाशिकमध्ये 1989 यावर्षी मिळालेल्या अ.वा. वर्टी पुरस्कार, तसेच त्यावेळी झालेल्या कुसूमाग्रजांच्या भेटीच्या आठवणींचा पट उलगडला. आयुष्यातील मूलभूत आनंदाचा शोध हा प्रत्येक मोठ्या साहित्यिकाच्या साहित्यात दिसून येतो. अगदी  भगवद्गीतेतही तो दिसून येतो. त्यापेक्षा कैक पटींनी ज्ञानेश्वरीत दिसून येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जीवनात मिसळून जाण्याची उन्मनी अवस्था आणि आनंदाचा शोध हाच ललित वाङ्मयाचा प्राणस्वर आहे. आनंद हा जगण्यापासून, जीवनापासून वेगळा नसतो. किंबहुना तो सृष्टीचेच स्वरूप असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ लेखिका आशा बगे यांनी केले. 


सर्व काव्याचे मूळ हे ज्ञानेश्वरीत


मूलभूत आनंद हा भावाचेच रूप असून अभावापासून कोणतेही सत्य निर्माण होत नाही. कोलाहलातही आपणच आपल्या स्वतःला परजून ठेवावेसे वाटणे आणि तास तो स्वर केवळ लेखकचं परजून ठेवतात. माणसाचा मूलभूत संबंध हा निर्सगाशी आणि सृष्टीशीच असून , तो तोडून कोणालाही काही सध्या करता येतंब नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मराठीतील सर्व काव्याचे मूळ हे ज्ञानेश्वरीत आहे, असे मला वाटते. कुसुमाग्रजांचे काव्य अभ्यासक्रमात आल्यानंतर मराठी कवितेचे वैभव उलगडत गेल्यानेच मला कवितेत रस निर्माण होऊन माझा प्रवास अधिक सूक्ष्मतेकडे सुरु झाल्याचे त्या म्हणाल्या.