Nashik SSC Exam : एकीकडे विद्यार्थ्यांमध्ये पाली भाषेचा (Pali Language) कल वाढतो असल्याचे सांगितलं जात आहे मात्र, यंदाच्या दहावीच्या परीक्षेत नाशिक (Nashik) विभागातून केवळ एका विद्यार्थ्याने पाली भाषेची परीक्षा दिल्याचे समोर आलं आहे. जळगावमध्ये दहावीच्या परीक्षा केंद्रावर पाली या विषयाची परीक्षा केवळ एकाच विद्यार्थ्याने दिली. 


राज्यभरात दहावी बारावीच्या परीक्षा सुरु आहेत. 2 मार्चपासून दहावीच्या परीक्षांना (SSC Exam) सुरुवात झाली असून शुक्रवारी द्वितीय भाषेचा पेपर असल्याने पाली भाषेच्या परीक्षेसाठी केवळ एकच परीक्षार्थी असल्याचं समोर आलं आहे. इयत्ता दहावी परीक्षेत शुक्रवारी संस्कृतसह इतर भाषा विषयांची परीक्षा पार पडली. फ्रेंच, जर्मन, पर्शियन, उर्दू, गुजराती, अरेबिक, अवेस्ता, पहलवी, रशियन, पाली अशा विविध भाषा विषयांची विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. मात्र नाशिक (Nashik Division) विभागातील चारही जिल्ह्यात पाली या विषयाची परीक्षा केवळ एकाच विद्यार्थ्याने जळगाव (Jalgaon) येथे दिली. 


दहावी परीक्षेत विद्यार्थी नियमित विषय व्यतिरिक्त द्वितीय भाषा म्हणून काही विषयांची परीक्षा देतात. संस्कृत, उर्दू, फ्रेंच, जर्मन, पर्शियन तसेच सिंधी अशा द्वितीय भाषेची परीक्षा घेतली जाते. शुक्रवारी झालेल्या परीक्षेत द्वितीय भाषेची परीक्षा झाली. त्यामध्ये सर्वाधिक 11 हजार 842 विद्यार्थ्यांनी संस्कृत विषयाची परीक्षा दिली तर पाली द्वितीय भाषेच्या पेपरला केवळ एकच विद्यार्थी बसला होता. या एका विद्यार्थ्याने जळगाव केंद्रातून परीक्षा दिली. पुणे विद्यापीठात पाली भाषा स्वतंत्र विषय आहे मात्र, या विषयाच्या परीक्षेला विद्यार्थी पसंती देत नसल्याचे दिसून आले. 


संस्कृत परीक्षेला सर्वाधिक विद्यार्थी 


दरम्यान, संस्कृत विषयात चारही जिल्ह्यांमधून मोठ्या संख्येने विद्यार्थी परीक्षेला बसले होते. जवळपास 11 हजार विद्यार्थ्यानी संस्कृत विषयाची परीक्षा दिली. संस्कृत विषयाची नाशिक जिल्ह्यात 5038, धुळे मधून 1687, जळगावमधून 4680, नंदुरबारमधून 437 विद्यार्थ्यानी संस्कृतची परीक्षा दिली. तर उर्दू विषयाची परीक्षा 291 विद्यार्थ्यानी  दिली, त्यामध्ये नाशिकमधून 130 तर धुळ्यामधून 132 विद्यार्थी परीक्षेला बसले होते तसेच नंदुरबारमधून ३० विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तर अरेबिक कंपोझिट या विषयात विभागातून 1265, पर्शियन विषयाला 479, जर्मन विषयासाठी 11, फ्रेंच विषयाला 212, तर सिंधी विषयासाठी 65 विद्यार्थ्यांनी द्वितीय भाषेची परीक्षा दिली. या सर्वामध्ये केवळ पाली भाषा या विषयासाठी एकच विद्यार्थी परीक्षेला बसला होता.


पाली भाषेचे अनेक कोर्सेस 


भगवान गौतम बुद्धांनी पाली भाषेचा प्रचार-प्रसार केला. एकीकडे पाली भाषा शिकणाऱ्यांची संख्या वाढताना पाहायला मिळालं. त्यानंतर हळूहळू पाली भाषेचा शैक्षणिक अभ्यासक्रमात देखील समावेश करण्यात आला आहे. द्वितीय आणि तृतीय भाषा म्हणून दहावीचे विद्यार्थी परीक्षा देत असतात. राज्यभरात अनेक विद्यापीठांमध्ये पाली भाषा शिकण्यासाठी अनेक कोर्सेस देखील उपलब्ध आहेत. मात्र नाशिक विभागात दहावीच्या परीक्षेला केवळ एकच विद्यार्थी परीक्षेला बसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI