एक्स्प्लोर

Nashik : सीमा सुरक्षा दलातील जवान गायत्री जाधवचा 23 व्या वर्षीच जगाला निरोप, निफाड तालुक्यावर शोककळा, शेवटची इच्छा होती...

Nashik Army Woman Death : निफाड तालुक्यातील पहिली आणि नाशिक जिल्ह्यातील दुसरीच महिला फौजी असल्याने गावाची शान म्हणून प्रत्येक गावकऱ्याच्या व्हॉट्सअॅप स्टेट्सला गायत्री जाऊन पोहोचली होती.

Nashik Army Woman Death : 'मी आई बापासाठी काहीही करू शकले नाही मात्र माझ्या आई वडिलांना वाऱ्यावर सोडू नका' असं म्हणत नाशिकच्या (Nashik) निफाडमधील सशस्त्र सीमा बलात दाखल झालेली महिला फौजी गायत्री जाधवने (Gayatri Jadhav) वयाच्या 23 व्या वर्षीच या जगाला निरोप दिला. तिच्या जाण्याने संपूर्ण निफाड तालुक्यावर शोककळा पसरलीय. गायत्रीवर उपचार करण्यासाठी तब्बल 10 महिने कुटुंबाने सर्वतोपरी प्रयत्न केले होते, मात्र हे सर्व अपयशी ठरले.. काय घडलं नेमकं?

 आणि तिचे सगळे स्वप्न अपूर्ण राहिले...

गायत्री जाधव ही नाशिकच्या निफाड तालुक्यातील देवगावची शेतात मोलमजुरी करणाऱ्या जाधव कुटुंबातील चार मुलींपैकी तिसरी मुलगी होती. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीच असल्याने अगदी लहानपणापासूनच आई सोबत रोजंदारीचे काम करत तिने आपले शालेय शिक्षण पूर्ण केले होते. मात्र पोलीस किंवा सैनिक होण्याचे तिचे स्वप्न असल्याने मामाकडे राहून रोज 7 किलोमीटरचा प्रवास कधी पायी तर कधी सायकलवर जात तिने लासलगावला महाविद्यालयीन आणि त्यानंतर एका खासगी अकादमीत प्रशिक्षण पूर्ण केले होते. विशेष म्हणजे जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर स्टाफ सिलेक्शनमध्ये सीमा सुरक्षा दलात 21 मार्च 2021 ला अलवर राज्यस्थान येथे प्रशिक्षणासाठी तिची निवडही झाली होती. सशस्त्र सीमा बलात दाखल झालेली गायत्री ही निफाड तालुक्यातील पहिली आणि नाशिक जिल्ह्यातील दुसरीच महिला फौजी असल्याने देवगावची शान म्हणून प्रत्येक गावकऱ्याच्या व्हॉट्सअॅप स्टेट्सला गायत्री जाऊन पोहोचली होती. राज्यस्थानमध्ये 20 एप्रिल 2021 ला भरती होऊन तिचे प्रशिक्षण पूर्णत्वास जात असतांनाच सरावादरम्यान तिचा एक अपघात झाला आणि तोच अपघात तिचे सगळे स्वप्न अपूर्ण ठेवून गेला.  

महिला फौजीच्या कुटुंबावर आर्थिक संकट, सरकारकडून मदतीची अपेक्षा
गायत्रीची आई दुर्गाबाई विठ्ठल जाधव सांगतात  शाळेत जातांना टोमॅटो खुडायची आणि मग ती शाळेत जायची अशी आमची परिस्थिती होती. लोकांकडे कामाला माझ्यासोबत यायची, दोन बायकांचे कामं ती एकटी करायची. जे काम आले ते ती करायची. माझ्या सर्व मुलींना मी शिकवलं, माझ्या लेकीचे स्वप्न अपूर्ण राहून गेले, ती माझी मुलगी नाही मुलगा होता. सैन्यात जाई जाई पर्यंत ती माझ्या बरोबर मोलमजुरी करत होती. गायत्रीच्या जागेवर बहिण पूजा तरी सांभाळ करेल अशी तिची इच्छा होती. सरकारने एवढी तरी दखल घ्यावी आणि तिला तरी सरकारी नोकरी मिळावी. रुग्णालयातून घरी नेतांना मुलगी नीट राहील की नाही अशीच मला भीती वाटायची. एवढ्या जिद्दीने तिने नोकरी मिळवली होती, तिला देशसेवा करत आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे होते.

'माझ्या आई वडिलांना वाऱ्यावर सोडू नका'
दोन दिवसांपूर्वी मंगळवारी लासलगावला रुग्णालयात गायत्रीने अखेरचा श्वास घेतला आणि बुधवारी दुपारी देवगावच्या ग्रामपंचायतीच्या प्रांगणात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येऊन पंचक्रोशीतील हजारो नागरिकांनी 'भारत माता की जय' च्या घोषणा देत तिला भावपूर्ण वातावरणात निरोप दिला. गायत्रीच्या जाण्याने जाधव कुटुंबाचा कणाच जणू निखळलाय, तिच्या उपचारासाठी कुटुंबाच लाखो रुपये खर्च झाले असून सीमेवर देशाचे रक्षण करण्यासाठी निघालेल्या महिला फौजीच्या कुटुंबावर आता मोठं आर्थिक संकट कोसळल, सरकारकडे मदतीसाठी ते हात पसरत आहेत. शेवटचे तीन ते चार महिने गायत्री मृत्यूशी झुंज देत होती मात्र कुटुंबाचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले आहेत. तिचे शेवटचे शब्द एवढेच होते की, मी तर चाललीय. मात्र माझ्या आई वडीलांना वाऱ्यावर सोडू नका, माझ्या लहान बहिणीला सरकारी नोकरी द्या आणि तिची हिच ईच्छा आता सरकार, लोकप्रतिनिधी पूर्ण करणार का? हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.

गायत्रीचे मामा गणेश कोकणे सांगतात, एक सप्टेंबर 2021 ला ट्रेनिंग सुरु असतांना खड्ड्यात उडी मारतांना ती पडली होती, त्यावेळी ती बेशुद्ध अवस्थेत होती. आर्मी हॉस्पिटलमध्ये नंतर प्रकृतीत सुधारणा झाली होती. नंतर तिने परत ट्रेनिंग केले, मात्र एका महिन्यांनी ती परत पडली आणि राजस्थानच्या अलवारला सिटी स्कॅन केल्यानंतर डोक्यात गाठ झाली असून तिच्यावर शस्त्रक्रिया करावे लागेल, जयपूरला न्यावे लागेल असे सांगितले गेले. गायत्रीचे मामा म्हणतात, तिकडे गेल्यावर गायत्री म्हणायची फायरिंग, रनिंगमध्ये एक नंबर राहायची. तिला शपथ घेतांना ट्रॉफी घ्यायची आहे. ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर मी ऑपरेशन करते असे म्हटल्याने गोळ्या औषध घेऊन आराम करत गायत्री परत ट्रेनिंगला गेली होती. 8 फेब्रुवारी 2022 ला तिची तब्येत परत बिघडली, डोक्यात पाणी झाले होते आणि तिचे ऑपरेशन करावेच लागेल असे मला सांगितल्याने तिचे 22 फेब्रुवारीला ऑपरेशन केले आणि 3 मार्चला डिस्चार्ज मिळाला. ऑपरेशन झाल्यानंतर ट्रेनिंगला परत सुरु केल्यानंतर काही दिवसांनी परत तिला त्रास सुरूच होता. उलट्या व्हायच्या खूप तब्येत खालावली होती. परत तिला एडमिट केले आणि २४ मार्चला तिच्या बॅचची शपथ होऊन गेली. दोन वर्षानंतर तिला राहिलेलं ट्रेनिंग करता येईल. आता तुम्ही 30 दिवस सुट्टीवर जा आणि त्यानंतर तिची ड्युटी बिहारला केली आहे असे आम्हाला सांगण्यात आले. 

नाशिकला परतताना त्रास झाल्याने गायत्रीने लोकमान्य खाजगी रुग्णालयात त्यानंतर सोपान खाजगी रुग्णालयात उपचार घेतले. तिला नंतर नीट दिसत नव्हते. त्यामुळे मुंबईत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भरती पवारांच्या पत्राने लिलावतीला गायत्रीला तीन महिने नऊ दिवस एडमिट केले. तिच्या मेंदूला खूप मोठी गाठ झाली होती, मेंदूमध्ये 200 मिली पाणी निघाले होते. व्हेंटिलेटरवर पण ठेवले होते. पण त्यांनी सांगितलं की तिची दृष्टी परत येण्यासाठी दिल्लीला एम्सला न्या पण पैसे नसल्याने बिहारला जाऊन गायत्रीच्या कमांडरला भेटलो, तिच्या मेडिक्लेमच्या पैशांना यायला वेळ होता पण अडीच लाख रुपये त्यांनी दिले. दिल्लीत मी तिला हातावर उचलून चौथ्या मजल्यावर घेऊन जायचो उपचारासाठी एकदम बिकट परिस्थिती होती. गायत्री म्हणायची, "मामा तुम्ही फक्त मला बरं करा, मी बरी झाली की तुमचे सगळे पैसे फेडेल.

तिची प्राणज्योत मालवली 
ज्या मुलीच्या घरापर्यंत जाण्यासाठी खरं तर चांगला रस्ताही माहित नव्हता. तिच मुलगी देशसेवा करण्यासाठी बॉर्डरपर्यंत जाऊन पोहोचली होती, सशस्त्र सीमा बलात ती दाखल झाली होती. मात्र प्रकृतीने साथ दिली नाही आणि तिची ईच्छा अपूर्ण राहिली. काही दिवसांपूर्वी गायत्री दिल्लीहून उपचार घेऊन नाशिकला मामाच्या घरी तर आली. मात्र तिची प्रकृती अधिकच खालावल्याने लासलगावला ग्रामीण रुग्णालयात तिला उपचारासाठी दाखल करताच मंगळवारी दुपारी तिची प्राणज्योत मालवली आणि कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9PM TOP Headlines 09 PM 20 January 2025Pankaja Munde on Beed Guardian Minister | बीडचं पालकमंत्रिपद दिलं असतं तर आनंद झाला असता-पंकजा मुंडेZero Hour Jitendra Awhad : धनंजय मुंडेंबाबत जितेंद्र आव्हाडांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 08 PM 20 January 2025

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Embed widget