नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची (Maharashtra Assembly Elections 2024) रणधुमाळी सुरु झाली आहे. राज्यात महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सामना रंगणार असून सध्या प्रत्येक पक्षाकडून जागा वाटप केले जात आहे. नाशिकच्या देवळाली विधानसभा मतदारसंघात (Deolali Assembly Constituency) महायुतीत (Mahayuti) अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीने विद्यमान आमदार सरोज अहिरे (Saroj Ahire) यांना पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. तर महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) शिवसेना ठाकरे गट (Shiv Sena UBT) आणि राष्ट्रवादी शरद पवार गटात (NCP Sharad Pawar Group) या जागेवरून जोरदार रस्सीखेच सुरु होती. मात्र ही जागा अखेर ठाकरे गटाला मिळाली आहे. ठाकरे गटाने माजी आमदार योगेश घोलप (Yogesh Gholap) यांना संधी दिली आहे. त्यामुळे देवळालीत सरोज अहिरे विरुद्ध योगेश घोलप (Saroj Ahire vs Yogesh Gholap) असा सामना रंगणार आहे.


लोकसभा निवडणुकीनंतर देवळाली विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मिळणार असल्याची चर्चा नाशिकमध्ये रंगली होती. त्यानंतर तुतारीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी शिवसेना ठाकरे गटासह इतर पक्षातील उमेदवार इच्छुक असल्याचे पाहायला मिळाले होते. त्यातच गेल्या पाच ते सहा दिवसांपासून देवळालीची जागा शिवसेना ठाकरे गटाला सुटावी, यासाठी शिवसैनिक मुंबईमध्ये ठाण मांडून बसले होते. आता अखेर देवळाली विधानसभा मतदारसंघाची जागा ठाकरे गटाच्या वाट्याला आली आहे. 


देवळालीत पुन्हा सरोज अहिरे विरुद्ध योगेश घोलप


माजी आमदार योगेश घोलप यांना शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मागील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरोज अहिरे यांनी योगेश घोलप यांचा पराभव केला होता. सरोज अहिरे अजित पवार गटात गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने या जागेवर दावा केला होता. मात्र अखेर ही जागा आपल्याकडे खेचण्यात शिवसेना ठाकर गटाला यश आले आहे. त्यामुळे 2019 च्या निवडणुकीप्रमाणे सरोज अहिरे आणि योगेश घोलप पुन्हा एकदा या निवडणुकीत आमने-सामने येणार आहेत. या निवडणुकीत कोण बाजी मारणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. 


शहरातील चारपैकी तीन जागा ठाकरे गटाकडे 


दरम्यान, देवळाली विधानसभा मतदारसंघाची जागा ठाकरे गटाला मिळाल्याने महाविकास आघाडीमध्ये शिवसेना ठाकरे गटाने नाशिक शहरातील तीन जागा आपल्याकडे खेचल्या आहेत. या अगोदर शहरातील मध्य व पश्चिम विधानसभा मतदारसंघात वसंत गिते व सुधाकर बडगुजर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 


आणखी वाचा


Maharashtra Vidhan Sabha Election 2024: शिवसेना ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर; यामिनी जाधवांविरुद्ध मोठी खेळी, धुळ्यातून अनिल गोटे यांना संधी