Maharashtra Vidhan Sabha Election 2024: आगामी विधानसभेच्या निवडणुकीची (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) घोषणा झाल्यानंतर राज्यातील सर्वंच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. याचदरम्यान शिवसेना ठाकरे गटाने (Thackeray Shivsena UBT) विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. ठाकरे गटाच्या या यादीमध्ये एकूम 15 उमेदवारांचा समावेश आहे. शिंदे गटाच्या विद्यामान आमदार यामिनी जाधव यांच्याविरुद्ध ठाकरे गटाने भायखळा विधानसभा मतदारसंघातून मनोज जामसुतकर यांना उमेदवारी दिली आहे.

शिवसेना ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर; कोणाला संधी?

१) धुळे शहर- अनिल गोटे

२)चोपडा (अज)- राजू तडवी

३) जळगाव शहर- जयश्री सुनील महाजन, 

४) बुलढाणा- जयश्री शेळके, 

५) दिग्रस- पवन श्यामलाल जयस्वाल

६) हिंगोली- रूपाली राजेश पाटील

७) परतूर- आसाराम बोराडे

८) देवळाली (अजा) योगेश घोलप

 ९)कल्याण पश्चिम- सचिन बासरे

 १० )कल्याण पूर्व - धनंजय बोडारे

 ११) वडाळा- श्रद्धा श्रीधर जाधव

१२ ) शिवडी- अजय चौधरी

१३) भायखळा- मनोज जामसुतकर

 १४) श्रीगोंदा- अनुराधा राजेंद्र नागावडे

 १५) कणकवली- संदेश भास्कर पारकर.

ठाकरेंच्या पहिल्या यादीत कोणाला मिळाली उमेदवारी, पाहा संपूर्ण यादी-

चाळीसगाव – उन्मेश पाटीलपाचोरा – वैशाली सुर्यवंशीमेहकर (अजा) – सिद्धार्थ खरातबाळापूर – नितीन देशमुखअकोला पूर्व – गोपाल दातकरवाशिम (अजा) - डॉ. सिद्धार्थ देवळेबडनेरा – सुनील खराटेरामटेक – विशाल बरबटेवणी – संजय देरकरलोहा – एकनाथ पवारकळमनुसी – डॉ. संतोष टारफेपरभणी – डॉ. राहुल पाटीलगंगाखेड – विशाल कदमसिल्लोड – सुरेश बनकरकन्नड – उदयसिंह राजपुतसंभाजीनगर मध्य – किशनचंद तनवाणीसंभाजीनगर प. (अजा) – राजु शिंदेवैजापूर – दिनेश परदेशीनांदगांव – गणेश धात्रकमालेगांव बाह्य – अद्वय हिरेनिफाड – अनिल कदमनाशिक मध्य – वसंत गीतेनाशिक पश्चिम – सुधाकर बडगुजरपालघर (अज) – जयेंद्र दुबळाबोईसर (अज) – डॉ. विश्वास वळवीभिवंडी ग्रामीण (अज) – महादेव घाटळअंबरनाथ – (अजा) – राजेश वानखेडेडोंबिवली – दिपेश म्हात्रेकल्याण ग्रामीण – सुभाष भोईरओवळा – माजिवडा – नरेश मणेराकोपरी पाचपाखाडी – केदार दिघेठाणे – राजन विचारेऐरोली – एम.के. मढवीमागाठाणे – उदेश पाटेकरविक्रोळी – सुनील राऊतभांडूप पश्चिम – रमेश कोरगावकरजोगेश्वरी पूर्व – अनंत (बाळा) नरदिंडोशी – सुनील प्रभूगोरेगांव – समीर देसाईअंधेरी पूर्व – ऋतुजा लटकेचेंबूर – प्रकाश फातर्पेकरकुर्ला (अजा) – प्रविणा मोरजकरकलीना – संजय पोतनीसवांद्रे पूर्व – वरुण सरदेसाईमाहिम – महेश सावंतवरळी – आदित्य ठाकरेकर्जत – नितीन सावंतउरण – मनोहर भोईरमहाड – स्नेहल जगतापनेवासा – शंकरराव गडाखगेवराई – बदामराव पंडीतधाराशिव – कैलास पाटीलपरांडा – राहुल ज्ञानेश्वर पाटीलबार्शी – दिलीप सोपलसोलापूर दक्षिण – अमर रतिकांत पाटीलसांगोले – दीपक आबा साळुंखेपाटण – हर्षद कदमदापोली – संजय कदमगुहागर – भास्कर जाधवरत्नागिरी – सुरेंद्रनाथ (बाळ) मानेराजापूर – राजन साळवीकुडाळ – वैभव नाईकसावंतवाडी – राजन तेलीराधानगरी – के.पी. पाटीलशाहुवाडी – सत्यजीत आबा पाटील

महाविकास आघाडीचे 90-90-90 फॉर्म्युला-

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नवी दिल्लीत आहेत. बाळासाहेब थोरात यांनी नवी दिल्लीत बोलताना महाविकास आघाडीचा नवा फॉर्म्युला सांगितला आहे.  महाविकास आघाडीच्या जागावाटपासंदर्भात देखील थोरात यांनी भाष्य केलं आहे. मित्रपक्षांना आम्ही 18 जागा दिलेल्या आहेत. आता तीन राजकीय पक्षांचा फॉर्म्युला 85-85-85 वरुन 90-90-90 वर पोहोचला असल्याचं त्यांनी म्हटलं.

संबंधित बातमी:

Sujay Vikhe vs Balasaheb Thorat: जयश्री थोरातांबद्दल आक्षेपार्ह विधान; पोलीस स्थानकासमोर रात्रभर ठिय्या आंदोलन, संगमनेरमध्ये वाद चिघळला