Nashik Rain : गेल्या दोन दिवसांपासून नाशिकला (Nashik News) अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) अक्षरशः झोडपून काढले आहे. अनेक तालुक्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस आणि गारपीट देखील झाली आहे. तसेच या पावसामुळे जीवितहानी झाल्याचंही समोर आलं आहे. सिन्नर तालुक्यात (Sinnar Taluka)  सायंकाळी जनावरांसाठी शेतात चारा आणायला गेलेल्या एका शेतकऱ्याचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला आहे. बाळू गीते (वय 60 वर्ष) असे शेतकऱ्याचे नाव आहे.


अवकाळी पावसामुळे पिकांना मोठा फटका


राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. या पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांची उभी पिकं जमीनदोस्त झाली आहेत. अशातच या पावसामुळे काही ठिकाणी जीवितहानी देखील झाली आहे. परभणी जिल्ह्यात वीज पडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात देखील वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. तर त्र्यंबकेश्वरला अंगावर वीज पडून एक महिला जखमी झाली आहे. 


गहू, द्राक्ष, कांदा, हरभरा पिकांचे नुकसान


सुलतानी सोबतच अस्मानी संकटाचा सध्या बळीराजाला सामना करावा लागत आहे. या अवकाळी पावसामुळे गहू, द्राक्ष, कांदा, हरभरा या पिकांसह भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. शनिवारी ( 18 मार्च)  केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी सायंकाळचे मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत होणारे आपले नियोजित कार्यक्रम रद्द करत निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पोहोचल्या होत्या. कुंभारी गावात गारपीटीमुळे झालेल्या द्राक्षबागांच्या नुकसानीचा आढावा घेऊन भारती पवार यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली होती. तसेच कृषी अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याच्या सूचनाही भारती पवार यांनी केल्या आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Solapur Rain : सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस आणि पंढरपूर तालुक्यात गारपीट, शेती पिकांना मोठा फटका