Nashik: नाशिककरांना युद्धभूमीच थरार जवळून अनुभवता यावा यासाठी नाशिकच्या (Nashik) ईदगाह मैदानावर भव्य शस्रास्रांचे प्रदर्शन (Arms Exhibition) भरविण्यात आले असून तोफा, रणगाडे रॉकेट लॉन्चर (Tank, rocket launcher) पाहून जणू काही युद्धभुमीवर आल्याचा भास झाल्याशिवाय राहणार नाही. दोन दिवसीय या प्रदर्शनाचे उदघाटन आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (nitin gadkari) यांच्या हस्ते करण्यात आले.
आपण आज सुखान जीवन जगतो. ही आपल्या भारतीय सैन्याची लष्कराची (indian army) देणं आहे. आपण नेहमीच विचार करतो, कसा युद्ध सराव केला जात असेल, युद्धासाठी कोणती शस्रे वापरली जात असतील? याबाबत सर्व सामान्य नागरिकांच्या मनात नेहमीच जाणून घेण्याची उत्सुकता असते. हीच उत्सुकता आणि कुतूहल पूर्ण करण्यासाठी नाशिक (Nashik) येथील आर्टीलरी सेंटरच्या वतीने नाशिककरांना संधी उपलब्ध करून दिली आहे.
नाशिकच्या ईदगाह मैदानावर (Eidgah Maidan, Nashik ) दोन दिवसीय शस्त्रास्त्र प्रदर्शनाला (Arms Exhibition) आजपासून सुरुवात झाली. हे प्रदर्शन नाशिककरांसाठी (Nashik) पुर्णत: खुले असून मैदानावर लष्करातील बोफोर्स, धनुष्य, सॉल्टम आदी तोफांसह रॉकेट लौंचर आणि लॉरोससारखे आधुनिक रडार जवळून बघण्याची संधी निर्माण करून देण्यात आली आहे. नाशिकरोड (Nashik) तोफखाना केंद्राकडून 'नो युअर आर्मी' (Know Your Army) हे लष्करी शस्त्रास्त्रांचे (Arms Exhibition) राज्यस्तरीय प्रदर्शन नाशिकमध्ये (Nashik) भरविण्यात आले आहे. दरम्यान राज्यात प्रथमच अशाप्रकारचे सैनिकी (indian army) शस्त्रांस्त्रांचे प्रदर्शन एखाद्या शहरी वस्तीतील मैदानावर होत आहे. यानिमित्ताने नाशिकसह (Nashik) संपुर्ण उत्तर महाराष्ट्रातील (maharashtra) जनतेला तोफखान्याच्या शक्तीशाली आधुनिक तोफांसह रडार सिस्टीम, भुदलाकडे असलेल्या अत्याधुनिक रायफल्स, अश्वारूढ सैनिकांकडून (indian army) दाखविले जाणारे सैनिकी प्रात्याक्षिकांसह तोफखाना केंद्राच्या विशेष बॅन्ड पथकाच्या गीतगायन-वादनाचा अनुभव घेता येणार आहे. रविवारी रात्री साडेनऊ वाजता प्रदर्शनाचा समारोप होणार आहे.
लष्करातील लढाऊ तोफांचे प्रदर्शन
दरम्यान, कारगिल युद्धभूमीवर (kargil war) विजयात सिहांचा वाटा उचलणारी बोफोर्स तोफ, स्वदेशी बनावटीची आधुनिक धनूष, हलकी होवित्झर, इंडियन फिल्ड सॉल्टम (Indian Field Saltam), उखळी मारा करणारी तोफ, मल्टी बॅरल रॉकेट लॉन्चर (Multi barrel rocket launcher), लोरोस रडार सिस्टीमसह अशा लहान-मोठ्या 10 ते 15 तोफा नागरिकांना बघण्याची संधी यानिमित्ताने मिळाली आहे.
इतर महत्वाची बातमी: