नाशिक : मोदींचा मूड आता बिघडलाय. देश हातून चालला आणि त्यांची भाषा बदलली आहे, अशी टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) केली आहे. आज धुळे लोकसभा मतदारसंघाच्या (Dhule Lok Sabha Constituency) महाविकास आघडीच्या अधिकृत उमेदवार डॉ. शोभा बच्छाव (Dr Shobha Bachhav) यांच्या प्रचारार्थ सटाणा येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
जयंत पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांकडून पैसे काढण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत शेतकऱ्याच्या खिशातून लाखो रुपये काढले गेले आहेत आणि हे ६ हजार देत आहेत. आमच्या सरकारच्या काळात गरीबांना कर आकारणी केली जात नव्हती. गरजेच्या वस्तू खरेदी करताना आता 28 टक्क्यांपर्यंत टॅक्स भरावा लागतो. आमचे सरकार आले तर आम्ही शेतकऱ्यांच्या औजारावरील कर काढून टाकू.
मोदींचा मूड आता बिघडलाय
देशाचे प्रधानमंत्री भाषण करत आहेत. कोणत्या स्तरावर जावून भाषण करतात ते उल्लंघन करताय. भाषेत आणि धर्मात तेढ निर्माण करण्याचे भाषा ते करत आहेत. हिंदू - मुस्लिम यांच्यात देखील तेढ निर्माण करायचे काम पंतप्रधान करत आहेत. मोदींचा मूड आता बिघडलाय. देश हातून चालला आणि त्यांची भाषा बदलली आहे, असे टीका त्यांनी पंतप्रधान मोदींवर केलीये.
भाजपचे तत्व बदलले
आमचा जाहीरनामा शेतकरी हिताचा आहे. कांदा, कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे सध्या हालचाल सुरू आहे. भाजपची सुरुवातीला 400 पारची भाषा होती. आता 200 पेक्षा पुढे जाणे ही अवघड आहे. मोदींच्या आजूबाजूला आता सगळे भ्रष्टाचारी डाव्या उजव्या बाजूला बसलेले आहेत. काँग्रेसमुक्त भारत करण्याची भाषा केली होती. सगळ्याच पक्षातील लोक काढून घेतले. भाजपचे तत्व बदलले आहे. शेवटच्या दोन दिवसात खूप पैशाचा पाऊस पडतो. निवडणूक आयोग डोळे बंद करून काम करत आहेत. तक्रार करून कोणतीही कारवाई नाही, अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या