नाशिक : गेल्या काही दिवसांपासून नाशिकचे राजकीय महत्व वाढले आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S Jaishankar) आज नाशिक दौऱ्यावर आले आहेत. एस. जयशंकर यांच्या दौऱ्याची सुरुवात देव दर्शनाने झाली आहे. काळाराम मंदिरात (Kalaram Mandir) दाखल होत एस. जयशंकर यांनी दर्शन घेतले. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) नाशिक दौऱ्यावर होते. त्यानंतर आज एस. जयशंकर नाशिक दौऱ्यावर आले आहेत. 


गुरुदक्षिणा हॉलमध्ये एस. जयशंकर यांचे व्याख्यान 


कॉलेजरोडवरील गुरुदक्षिणा हॉलमध्ये त्यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम नाशिककरांसाठी करण्यात आला आहे. तसेच एस. जयशंकर यांच्या उपस्थितीत आज नाशिकमध्ये विविध बैठकांचेही आयोजन करण्यात आले आहे. 


एकनाथ शिंदेही नाशिक दौऱ्यावर


दरम्यान, महायुतीचे अधिकृत उमेदवार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या प्रचारानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व विधान परिषद उपसभापती निलम गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुती महिला आघाडी मेळाव्याचे आयोजन नाशिकमध्ये करण्यात आले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Sanjay Raut : 'कितीही सभा घ्या, रोड शो घ्या, महाराष्ट्र तुमच्यामागे उभा राहणार नाही'; संजय राऊतांचा नाशिकमधून पीएम मोदींवर घणाघात


'नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादीचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण नक्की होणार', PM मोदींची ठाकरे-पवारांवर जोरदार टीका