Nashik News नाशिक : नाशिकचे सुपुत्र व भारतीय लष्करातील वीर जवान हेमंत यशवंतराव देवरे (Hemant Deore) हे भारत चीन सीमेवर (Indo China Border) कर्तव्यावर असताना शहीद झाले आहेत. यामुळे जिल्ह्याभरात शोककळा पसरली आहे. शहीद हेमंत देवरे हे नाशिकच्या इंदिरानगर भागातील, नागरे मळा येथील रहिवाशी होते.


त्यांचे पार्थिव उद्या मंगळवार (दि. 6) दुपारी 2 वाजता नाशिक इंदिरानगर, नागरे मळा येथे आणण्यात येणार आहे. शहीद जवान हेमंत देवरे हे येथील एसीपी कार्यालय येथे कार्यरत असलेल्या महिला पोलीस शिपाई वंदना देवरे यांचे पती आहेत. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, दोन बहिणी असा परिवार आहे.


छगन भुजबळ यांनी अर्पण केली श्रद्धांजली


शहीद जवान हेमंत देवरे यांना छगन भुजबळ यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. छगन भुजबळ यांनी म्हटले आहे की, भारतीय सैन्यात कार्यरत असलेले जवान, आपल्या नाशिकचे सुपुत्र हेमंत यशवंतराव देवरे यांना पश्चिम बंगालमधील सिलिगुडी येथे देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले. भारतमातेच्या या वीर सुपुत्रास भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी व माझा संपूर्ण परिवार सहभागी आहे. त्यांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो व मृतात्म्यास सद्गती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!


शहीद जवान संदीप मोहिते अनंतात विलीन


मांडवड येथील लष्करी सेवेत असलेले जवान संदीप भाऊसाहेब मोहिते (Sandip Mohite) हे लेह लडाख (leh ladakh) येथे मशीन ऑपरेटिंग करताना गुरुवारी शहीद झाले. जवान संदीप मोहिते यांचे पार्थिव मांडवड (Mandwad) गावी दाखल होताच भारत माता की जय, वीर जवान अमर रहे अशा घोषणा देत शहीद जवान मोहिते यांना अखेरचा निरोप देण्यात आला. मोहिते कुटुंबियांनी यावेळी हंबरडा फोडला. शुक्रवारी सकाळी शहीद जवान मोहिते यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात देवराज (5) दक्ष (3) अशी दोन मुले असून वडील भाऊसाहेब मोहीते,आई प्रमिला मोहीते भाऊ शिवाजी मोहिते हे आपला शेती व्यवसाय करत असून श्रीकांत मोहिते हे सैन्यदलात आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या


"निवृत्तीनाथ माऊली असो किंवा अयोध्येचा राम, वारकरी बांधवांना अंतर्मनाचा आनंद मिळो हीच प्रार्थना"; त्र्यंबकला रंगला भव्य रिंगण सोहळा


Nashik Lok Sabha Constituency : नाशिक लोकसभेवरून ठाकरे गट आणि शरद पवार गटात जुंपली, महाविकास आघाडीत बिघाडी?