Dindori Lok Sabha Constituency : दिंडोरी लोकसभा मतदारसंघ गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आला आहे. दिंडोरीत एकीकडे महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) बिघाडी झाली आहे. तर दुसरीकडे आता महायुतीचेही टेन्शन वाढणार आहे. दिंडोरीच्या भाजपच्या उमेदवार डॉ. भारती पवार (Bharti Pawar) या आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मात्र त्याच वेळी दिंडोरीतील भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण (Harishchandra Chavan) बंडखोरी करणार आहेत. 


काही दिवसांपूर्वी माकपचे माजी आमदार जे पी गावित (J P Gavit) यांनी बंडखोरी करत दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. दिंडोरीची जागा माकपला द्यावी, अन्यथा शरद पवार गटाने दिलेला उमदेवार पडणार, असा इशाराच जे पी गावित यांनी शरद पवारांना (Sharad Pawar) दिला होता. त्यामुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे. तर आता भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण हे बंडखोरी करणार असल्याने डॉ. भारती पवारांना मोठं आव्हान निर्माण झालंय.


हरिश्चंद्र चव्हाण आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार


माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण आज बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. एकीकडे भारती पवार आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत मोठं शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्याचवेळी हरिश्चंद्र चव्हाण बंडखोरी करणार आहेत. भारती पवारांच्या कार्यपद्धतीवर हरिश्चंद्र चव्हाणांनी नाराजी व्यक्त केली आहे. गेल्याच आठवड्यात भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनीही भारत पवारांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. आता दिंडोरीतील बंड थंड करणे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसमोर मोठं आव्हान आहे. 


कोण आहेत हरिश्चंद्र चव्हाण?


हरिश्चंद्र चव्हाण हे सलग दोन वेळा दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. 2019 साली त्यांच्याकडे हॅटट्रीक करण्याची संधी होती. मात्र, भारतीय जनता पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारली होती. निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या डॉ. भारती पवार यांना भाजपने उमेदवारी दिली होती. 2014 मध्ये हरिश्चंद्र चव्हाण यांनीच भारती पवार यांचा दारुण पराभव केला होता. आता हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार आहेत.  


इतर महत्वाच्या बातम्या 


मोठी बातमी ! अखेर नाशिकचा तिढा सुटला, शिवसेना विरुद्ध शिवसेनाच; हेमंत गोडसेंना तिसऱ्यांदा संधी


Nashik Lok Sabha : अखेर नाशिकचा तिढा सुटला! गोडसेंच्या नावावर शिक्कामोर्तब होताच भुजबळांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....