Nashik News नाशिक : नाशिकच्या चांदवड तालुक्यात (Chandwad Taluka) एक अपघाताची घटना घडली आहे. डंपर आणि दुचाकीच्या धडकेत (Accident) दुचाकीवरील दोन मेंढपाळांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी वडनेर भैरव पोलीस ठाण्यात (Vadner Bhairav Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  


याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिकच्या चांदवड तालुक्यातील चांदवड-लासलगाव रस्त्यावरील वाळकेवाडी फाटा शिवारात डंपर व दुचाकी यांच्यात अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. नाना साधू मलगुडे व काशिनाथ पिरा कुल्हाळ (Nana Sadhu Malgude and Kashinath Pira Kulhal) असे दोघांचे नावे आहेत.


डोक्याला जबर मार लागल्याने दोघांचा मृत्यू


मेंढीचे कोकरू बाजारात विकून परतत असताना त्यांच्या दुचाकीला डंपरने धडक दिली. या अपघातात नाना मलगुडे व काशिनाथ कुल्हाळ यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने दोघांचा जागीच मुत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस (Police) घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी वडनेर भैरव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


छत्रपती संभाजीनगरमध्ये टँकरमधून गॅस गळती


छत्रपती संभाजीनगर शहरातील जालना रोडवरील वसंतराव नाईक चौक उड्डान पुलाजवळ एन-4 सिडको या ठिकाणी एच.पी.कंपनीचे गँस टँकरला गुरुवारी अपघात (Accident) झाला. या गॅस टँकरमधून मोठ्या प्रमाणात गॅस गळती झाली. गॅस हवेमध्ये पसरल्याने खबरदारी म्हणून या परिसरात कलम 144 लागू करण्यात आला.


समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात


समृद्धी महार्गावरील वाशिमच्या (Washim) कारंजाजवळ लोकेशन क्रमांक 173 वर झाला आहे. नागपूरवरून पुण्याला जाणाऱ्या एका खाजगी बसने ट्रकला जोरदार धडक (Accident) दिली आहे.बसमधील 16 ते 17 प्रवासी जखमी असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. हा अपघात 1 फेब्रुवारीच्या रात्री एक ते दीड वाजताच्या सुमारास झाला. समृद्धी महार्गावर प्रवास करताना अचानक नीलगाय रस्त्यावर आडवी आल्याने हा अपघात झाला असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे समृद्धी महामार्ग हा जागतिक दर्जाचा आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना असलेला महामार्ग असल्याचा कितीही दावा केला तरी, त्यावर होणाऱ्या अपघातांमुळे या महामार्गाचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या