Dr Bharti Pawar : विरोधकांच्या स्क्रिप्ट बजेट येण्यापूर्वीच तयार असतात. हा अर्थसंकल्प सर्वांच्या उन्नतीचा मार्ग निश्चित करेल. जादूचे प्रयोग जनतेने केले आहे. तीनही राज्यात भाजपला आशीर्वाद मिळाले असल्याचा टोला केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. 


आज संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman)  यांनी देशाचा अर्थसंकल्प (Budget 2024) सादर केला. यंदाचे वर्ष निवडणुकीचे वर्ष असल्यामुळे यंदा केंद्र सरकारकडून अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी सर्वसामान्यांसाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या. या पार्श्वभूमीवर डॉ. भारती पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.


विकसित भारताचा हा अर्थसंकल्प


डॉ. भारती पवार म्हणाल्या की,  विकसित भारताचा हा अर्थसंकल्प आहे. महिला सक्षमीकरणासाठी मुद्रा योजनेतून कर्ज देण्यात आले आहेत. 9 कोटी बचत गटांना लखपती दिदी करण्यात आले आहे. जेणेकरून सर्वांना आर्थिक पाठबळ मिळेल, यासाठी योजना करण्यात आली आहे.  मत्स्यसंपदा योजना, कृषी सिंचन योजना यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. 15 नवीन एम्ससाठी तरतूद केली आहे. युवक, महिला किसान शेतकरी या सर्व स्तंभाच्या बळकटीकरणासाठी योजना सुरु करण्यात आल्या आहेत. भविष्यात वंदे भारत ट्रेन वाढवण्याचा संकल्प आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. 


काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?


या अंतरिम अर्थसंकल्पात विशेषत: महिला, शेतकरी, गरिब, युवा आणि मध्यमवर्गीय अशा सर्वच घटकांकडे विशेष लक्ष देण्याचा प्रयत्न झाला आहे. देशातल्या 1 कोटी कुटुंबांना सोलर यंत्रणा देऊन 300 युनिटपर्यंत वीज मोफत देण्याचा संकल्प यात आहे. गरिब, चाळीत, झोपडपट्टीत राहणारे, मध्यमवर्गीय यांना स्वत:चे घर घेण्यासाठी योजना तयार करण्यात येणार आहे. 1 लाख कोटींचा व्याजमुक्त निधी तयार करुन युवांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय तर अतिशय क्रांतीकारी असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. यातून आमचे युवा हे मोठ्या प्रमाणात उद्यमी होतील. यातून संशोधनाला आणि स्टार्टअप इकोसिस्टीमला मोठी चालना मिळेल, असा विश्वास देखील फडणवीसांनी व्यक्त केला. 


काय म्हणाले दादा भुसे?


या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी सर्वसामान्यांसाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या. यावर्षीचे बजेट हे देशाला दिशा देणारे ठरले आहे. वंचित, शोषित, कष्टकरी शेतकरी असे सर्वसमावेशक हे बजेट आहे. येणारा काळ हा भारताचा असेल हे या बजेट मधुन अधोरेखित झाले. शेतकऱ्यांना तसेच उद्योजकांना या बजेटने भरभरून दिले आहे. भारताचे नेतृत्व योग्य हातात आहे हे आज प्रत्येक भारतीयाला वाटेल सर्वसमावेशक असे हे बजेट आहे. आरोग्य, शिक्षण, पर्यटन, शेतकरी, महिला सक्षमीकरण, दळणवळण या सर्व बाबींचा कटाक्षाने समावेश करण्यात आल्याची प्रतिक्रिया नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे.


आणखी वाचा 


Uddhav Thackeray :भगवा एकच... आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि आपल्या शिवसेनेचा! दुसऱ्या शिवसेनेचा भगवा आम्हाला मान्य नाही, उद्धव ठाकरेंचा थेट वार