एक्स्प्लोर

Devendra Fadnavis: आम्ही माणूस आहोत, कुठे चुकलो तर साधू संतांनी आम्हाला सांगा, तुमचे आशीर्वाद आम्हाला पाहिजे; नाशिकमधून CM फडणवीस काय-काय म्हणाले?

Devendra Fadnavis: कुंभमेळ्याची सर्व कामे पारदर्शी होतील. कोणालाही फेव्हर होणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

Devendra Fadnavis: सिंहस्थासाठी (Kumbh Mela 2027) निधी कमी पडू नये म्हणून केंद्र आणि राज्य सरकार दोन्ही कटीबद्ध आहेत. सध्या सुमारे 6 हजार कोटी रुपयांच्या कामांचा शुभारंभ झाला असून, 20 हजार कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. सिंहस्थ सुरू होईपर्यंत एकूण 25 हजार कोटींची कामे पूर्णत्वास जातील, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली आहे. तर आम्ही माणूस आहोत. आम्ही कुठे चुकलो तर साधू संतांनी आम्हाला सांगा. तुमचे आशीर्वाद आम्हाला पाहिजे. चूक झाली तर आम्ही पुन्हा ती सुधारू, असे आवाहन त्यांनी साधू संतांना केले आहे. नाशिक (Nashik News) येथे कुंभमेळ्याच्या कामांच्या शुभारंभ सोहळ्यातून ते बोलत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 75 वर्षानंतर त्रिखंड योग असल्याने यंदाचा कुंभ विशेष आहे. दीर्घकाळ हा कुंभ चालणार आहे. प्रयागराजला कुंभमेळा झाला. त्यात जगातील सर्वात मोठा आस्थेचा कुंभ भरला होता. याच परंपरेत नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कुंभ आहे. गोदावरीत स्नान करण्यासाठी भाविक येत असतात. प्रयागराजला 15 हजार हेक्टर जागा आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला एकत्रित 500 एकर जागा आहे. त्यामुळे कमी जागेत कुंभ भरावावा लागतो. मागील कुंभ ही यशस्वी कुंभमेळा पार पडला. यावेळी 5 पट जास्त भाविक येणार आहेत. भाविकांच्या सुरक्षेची व्यवस्था करणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. 

Devendra Fadnavis: नाशिकमध्ये 25 हजार कोटींची विकासकामे

आमचे साधू महंत कुंभ चालवतात. आम्ही व्यवस्था देतो. नाशिकमध्ये 20 हजार कोटींची कामे हाती घेतली आहेत. ती 25 हजार कोटी रुपयांची होतील. 6 हजार कोटींची कामे सुरू झाले आहेत. सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी समन्वय राखून काम केल्याने मोठे काम होत आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या लोकांची मदत होत आहे. काही लोकांना विस्थापित व्हावे लागते. त्याला लोक तयार झाले. मी, एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांनी सांगितले आहे की, निधीची कमतरता भासू देणार नाही. 12 वर्षानी कुंभ येतो, त्यामुळे आम्ही काम करत आहोत. गोदावरी स्वच्छ झाली पाहिजे. गोदावरी निर्मळ झाली पाहिजे. इथे घाट बांधत आहोत. जुन्या मंदिरांचा जीर्णोद्धार करत आहोत. हे काम करत असताना त्याची जुनी ओळख जाणार नाही याची काळजी घेत आहोत. रामायण काळात राम आणि सीता सर्वाधिक वेळ इथे राहिले आहेत. इथे अंजनेरीचा पर्वत आहे. ज्योतिर्लिंग इथे आहे, त्यामुळे पुढील 25 वर्षांचा विकास लक्षात घेऊन कामे करत आहोत. त्र्यंबकेश्वरला निवडणूक आहे. त्यामुळे मी त्र्यंबकेश्वर बाबतीत बोलत नाही, नाहीतर जिल्हाधिकारी माझा माईक बंद करतील. तो अधिकार त्यांना आहे, असे देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

Devendra Fadnavis: आम्ही कुठे चुकलो तर साधू संतांनी आम्हाला सांगा

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, दोन रिंग रोड आपण तयार करतोय. त्यामुळे नाशिकला त्याचा फायदा होणार आहे. इथले एअर पोर्ट, रेल्वे स्टेशन, बस स्थानकचे काम करतोय. एआयचा वापर करून सीसीटीव्ही लावत आहोत. आधुनिक नाशिक तयार करत आहोत. 1200 एकर जागेत कुंभमेळ्यासाठी काम करत आहोत. त्यामुळे भविष्यात अडचण होणार नाही, याची आम्ही काळजी घेत आहोत. आम्हाला सर्वांचे सहकार्य पाहिजे, कोणाचे नुकसान होणार नाही, त्याकडं आम्ही लक्ष देत आहोत. कुंभमेळ्याची सर्व कामे पारदर्शी होतील. कोणालाही फेव्हर होणार नाही. कोणाला अडचण होऊ देणार नाही. टेंडरमध्ये आम्ही हस्तक्षेप करणार नाही. ती कामे अधिकाऱ्यांवर सोडा. आम्ही माणूस आहोत. आम्ही कुठे चुकलो तर साधू संतांनी आम्हाला सांगा. तुमचे आशीर्वाद आम्हाला पाहिजे. चूक झाली तर आम्ही पुन्हा ती सुधारू, असे आवाहन त्यांनी केले. 

आणखी वाचा 

Nashik Politics: नाशिकमध्ये भाजपचा काँग्रेसला 'दे धक्का'; दुसरे माजी जिल्हाध्यक्षही 'भाजपवासी'; 'या' बड्या नेत्यांनीही हाती घेतलं कमळ

महत्त्वाच्या बातम्या

नाशिकच्या NCCF खरेदी केंद्रावर पर राज्यातील हलक्या प्रतीचा कांदा, शेतकऱ्यांनी अडवले 20 ते 35 ट्रक, सखोल चौकशी करण्याची मागणी
नाशिकच्या NCCF खरेदी केंद्रावर पर राज्यातील हलक्या प्रतीचा कांदा, शेतकऱ्यांनी अडवले 20 ते 35 ट्रक, सखोल चौकशी करण्याची मागणी
Water Storage Of All Maharashtra Dam: राज्यातील सर्व प्रमुख धरणं तुडुंब भरली, मोठ्या शहरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली; राज्यातील धरणांमधील पाणीसाठ्याची A टू Z माहिती
राज्यातील सर्व प्रमुख धरणं तुडुंब भरली, मोठ्या शहरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली; राज्यातील धरणांमधील पाणीसाठ्याची A टू Z माहिती
Shalarth ID Scam: शालार्थ आयडी घोटाळ्यात सर्वात मोठी अटक, भाजप पदाधिकाऱ्याला सोलापूरच्या फार्महाऊसमधून बेड्या
शालार्थ आयडी घोटाळ्यात सर्वात मोठी अटक, भाजप पदाधिकाऱ्याला सोलापूरच्या फार्महाऊसमधून बेड्या
Vishwas Nangre Patil on Gen-Z: आजच्या पिढीचा केमिकल लोचा झालाय, त्यांना काही सांगणही अवघड झालंय; 'जेन झी'बाबत विश्वास नांगरेंच्या वक्तव्याची चर्चा
आजच्या पिढीचा केमिकल लोचा झालाय, त्यांना काही सांगणही अवघड झालंय; 'जेन झी'बाबत विश्वास नांगरेंच्या वक्तव्याची चर्चा

व्हिडीओ

Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act, 2024: लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
गुरुपौर्णिमेनिमित साईभक्ताचं गुप्तदान, शिर्डीत भाविकांची मांदियाळी; सोन्याचा हार, दोन दिवसांत किती दान?
गुरुपौर्णिमेनिमित साईभक्ताचं गुप्तदान, शिर्डीत भाविकांची मांदियाळी; सोन्याचा हार, दोन दिवसांत किती दान?
Video: अंधभक्त, इडियट ते अमित शाह 30 गाड्यांच्या ताफ्यातून जाताना थरथरत होते, राहुल गांधींच्या अत्यंत आक्रमक भाषणातील पाच मुद्दे; रिजिजू सातवेळा अन् सभापती बिर्लांनी 11 वेळा अडवत माईक सुद्धा बंद केला!
Video: अंधभक्त, इडियट ते अमित शाह 30 गाड्यांच्या ताफ्यातून जाताना थरथरत होते, राहुल गांधींच्या अत्यंत आक्रमक भाषणातील पाच मुद्दे; रिजिजू सातवेळा अन् सभापती बिर्लांनी 11 वेळा अडवत माईक सुद्धा बंद केला!
Devendra Fadnavis : ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
मन हेलावणारी घटना... जलजीवन मिशनसाठीच्या खड्ड्यात पडून 3 वर्षीय चिमुकली ठार; आई-वडिलांचा आक्रोश, ग्रामस्थांचा संताप
मन हेलावणारी घटना... जलजीवन मिशनसाठीच्या खड्ड्यात पडून 3 वर्षीय चिमुकली ठार; आई-वडिलांचा आक्रोश, ग्रामस्थांचा संताप
ST च्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य
ST च्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य
धर्मेंद्र प्रधानांनी कधीच शिक्षण मंत्रालय चालवलं नाही ते फक्त आरएसएसनं चालवलं, देशातील प्रत्येक विद्यापीठाचा कुलगुरु आरएसएसचा माणूस, व्यवस्थेचा आत्माच ताब्यात घेतलाय; राहुल गांधींचा हल्लाबोल
धर्मेंद्र प्रधानांनी कधीच शिक्षण मंत्रालय चालवलं नाही ते फक्त आरएसएसनं चालवलं, देशातील प्रत्येक विद्यापीठाचा कुलगुरु आरएसएसचा माणूस, व्यवस्थेचा आत्माच ताब्यात घेतलाय; राहुल गांधींचा हल्लाबोल
पॅलेटगन वापराचे आदेश गृहमंत्र्यांचेच, राहुल गांधींचा दावा, तर तुम्ही एखाद्याची हत्या केली असं आम्ही म्हणू का? रिजीजूंचा पलटवार!
पॅलेटगन वापराचे आदेश गृहमंत्र्यांचेच, राहुल गांधींचा दावा, तर तुम्ही एखाद्याची हत्या केली असं आम्ही म्हणू का? रिजीजूंचा पलटवार!
Embed widget