Eknath Shinde नाशिक : यंदा राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी (National Youth Festival) नाशिकची (Nashik) निवड करण्यात आली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन 12 जानेवारीला तपोवन (Tapovan) येथील मैदानावर होणार आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या मैदानाची पाहणी ते करणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी दुपारी 3.20 ला नाशिक विमानतळावर येणार आहेत. ते मोटारीने तपोवन येथील मैदानाकडे जातील. 3.40 वाजता ते पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या अनुषंगाने मैदानाची पाहणी करणार असून आढावा बैठक देखील घेणार आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे मुंबईला प्रयाण करणार आहेत.
तीन मंत्री नाशकात मुक्कामी
तब्बल 16 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महाराष्ट्राला राष्ट्रीय युवा महोत्सवाचे यजमानपद मिळाले आहे. नाशिकमध्ये हा महोत्सव होत असल्याने राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन व पालकमंत्री दादा भुसे यांनी कार्यक्रमासाठी नाशिकमध्ये मुक्काम ठोकून आहेत. युवा महोत्सवाचा उद्घाटन सोहळ्याला देशभरातील आठ हजार युवक-युवती सहभाग घेणार आहेत.
उद्घाटनाला दीड लाख लोक सहभागी होण्याचा अंदाज
युवक-युवतींच्या निवासासह भोजनाची व्यवस्था हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. परंतु मुख्य उद्घाटन सोहळ्यात देशभरातील एक ते दीड लाख लोक सहभागी होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. त्यादृष्टीने मैदानाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे सोमवारी दुपारी नाशिकमध्ये येत आहेत.
मंडप उभारणीचे काम युद्ध पातळीवर
सध्या मंडप उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. तपोवनातील रस्त्यांचे डांबरीकरण केले जात आहे. तसेच मैदानांची डागडुजी देखील केली जात आहे. राष्ट्रीय युवा महोत्सवाची जय्यत तयारी सुरु आहे. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडण्यासाठी योग्य ते नियोजन करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी दिले आहेत.
नाशिक शहर करणार चकाचक
शुक्रवार दि. 05 ते दि. 26 जानेवारीपर्यंत शहरातील विविध ठिकाणी नाशिक मनपाकडून स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे. नाशिक महानगर पालिकेचे आयुक्त डॉ.अशोक करंजकर यांनी याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.या मोहिमेसाठी शहरातील स्वयंसेवी संस्था, एनएसएसच्या विद्यार्थ्यांची मदत घेतली जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या