National Youth Festival नाशिक : यंदा राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी (National Youth Festival) नाशिकला (Nashik) बहुमान मिळाला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या हस्ते होणार तपोवन (Tapovan) येथील मैदानावर होणार आहे. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडण्यासाठी योग्य ते नियोजन करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी दिले असून प्रशासन सध्या चांगलेच कामाला लागल्याचे चित्र आहे.
राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी (National Youth Festival) एकूण 20 समित्यांची नेमणूक करण्यात आली आहे. 75 शासकीय अधिकाऱ्यांवर विविध जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. शहरात तपोवन परिसरातील 16 एकर मैदानावर पंतप्रधान मोदींच्या हस्ते महोत्सवाचे उदघाटन होणार आहे.
मंडप उभारणीचे काम युद्ध पातळीवर
याच पार्श्वभूमीवर तपोवनातील रस्त्यांचे डांबरीकरण केले जात आहे. तसेच मैदानांची डागडुजी देखील केली जात असून साफसफाई, मंडप उभारणी आणि इतर कामे सध्या युध्दपातळीवर सुरू आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यातून 8 हजार युवक आणि खेळाडू नाशिकमध्ये दाखल होणार आहेत.
जर्मन टेक्नोलॉजीवर आधारीत मंडपाची उभारणी
12 जानेवारी रोजी होणाऱ्या उद्घाटन सोहळ्याला अंदाजे एक लाख नागरिक उपस्थित राहतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. जर्मन टेक्नोलॉजीवर आधारीत 40 बाय 80 फूट मुख्य मंच येथे उभारला जात आहे. परराज्यातील 300 हून अधिक कामगार सध्या मेहनत घेताना दिसून येत आहे.
नाशिकमध्ये पंतप्रधानांचा रोड शो
पंतप्रधान मोदी नाशिकमध्ये दाखल झाल्यावर हेलिपॅडपासून ते कार्यक्रमळापर्यंत ते असा रोड शो करणार आहेत. राज्यातील दीड ते दोन लाख युवक-युवती त्यात सहभागी होतील. पंतप्रधान मोदींच्या रोड शोचा मार्ग नेमका कसा असेल हे अद्याप निश्चित झालेले नाही. कार्यक्रमस्थळालगत हेलिपॅड उभारून रोड शोचे आयोजन करण्याचा विचार प्रशासन करत असल्याची माहिती मिळत आहे.
जिल्हा परिषदेचा स्वच्छता सप्ताह
जिल्हा परिषदेच्या वतीने विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. दि.६ जानेवारी ते ११ जानेवारी दरम्यान विशेष स्वच्छता सप्ताह हाती घेण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी जिल्हा परिषदेच्या अधिनस्त सर्व विभागांना स्वच्छता मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या
बाहेर गेलेल्यांना आता परत प्रवेश नाही, काहीजण खोक्यात बंद झाले : उद्धव ठाकरे