Chhagan Bhujbal : सांगलीत ओबीसी नेते प्रकाश शेंडगे (Prakash Shendge) यांच्या गाडीला अज्ञाताकडून चपलांचा हार घालण्यात आला आहे. तसेच, गाडीवर शाईफेक करण्यात आली आहे. मराठा समाजाच्या नादी लागू नका, नाहीतर महाराष्ट्रात फिरू देणार नाही,अशा आशयाचे पत्र गाडीवर लावण्यात आलं आहे. यावरून पुन्हा मराठा-ओबीसी वाद पेटण्याची शक्यता आहे. यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 


छगन भुजबळ म्हणाले की,  प्रकाश शेंडगेंच्या गाडीवरील हल्ला निंदनीय आहे. हल्ला करून भीती दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अनेक वेळा माझ्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न झालेला आहे. मी कुणालाच्या बापालाही घाबरत नाही. घाबरून निवडणुकीतून माघार घेतलेली नाही. माझ्यामुळे जर महायुतीतील पक्षांना अडचण होत असेल तर मी बाजूला होतो. पण आपण लवकरच एकत्रित पणे निर्णय घेऊन निवडणुकीच्या कामाला लागलो पाहिजे. 


लोकशाहीत दादागिरीने कुणाला थांबवू शकत नाही


प्रकाश शेंडगे असतील किंवा कुठल्याही पक्षाचा एखादा नेता असेल. कुठल्याही समाजाचा असेल, तर लोक ठरवतील त्याला किती मते द्यायची, किती विरोध करायचा. आपण लोकशाहीत दादागिरीने कुणाला थांबवू शकत नाही. म्हणून प्रकाश शेंडगे यांचे संरक्षण करणे हे पोलिसांचे काम आहे, असे त्यांनी म्हटले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Sangli Loksabha : ओबीसी बहुजन पार्टीचे सांगली लोकसभेचे उमेदवार प्रकाश अण्णा शेंडगेंच्या गाडीला अज्ञातांकडून चप्पलचा हार


'तुम्ही एक भुजबळ पाडाल तर आम्ही 160 पाडू', ओबीसी नेत्याची मनोज जरांगे पाटलांना वॉर्निंग!