Nashik Lok Sabha Constituency : एकीकडे नाशिक लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) शिवसेना ठाकरे गटाने (Shiv Sena UBT) राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांना उमेदवारी दिली आहे. राजाभाऊ वाजे हे नाशिकमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. तर दुसरीकडे महायुतीत (Mahayuti) मात्र नाशिक लोकसभेचा तिढा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. महायुतीतून दररोज नवनवीन इच्छुकांची नावे समोर येत आहेत.
महायुतीत एकीकडे शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादीत (NCP) जोरदार रस्सीखेच सुरु असताना आता नाशिकच्या महंतांनी या वादात उडी घेतली आहे. धर्म अभ्यासक, महर्षि पंचायतन सिद्धपीठमचे पीठाधीश्वर अखिल भारतीय संत समिती, धर्म समाजाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महंत अनिकेत शास्त्री (Aniket Shastri) हे नाशिक लोकसभेच्या आखाड्यात उतरले आहेत.
भाजपची उमेदवारी आपल्यालाच मिळणार - अनिकेत शास्त्री
महंत अनिकेत शास्त्री यांनी आज उमेदवारी अर्ज घेतला आहे. भाजपची उमेदवारी आपल्यालाच मिळणार या भूमिकेवर अनिकेत शास्त्री आजही ठाम आहेत. पक्ष श्रेष्ठींनी सांगितले म्हणूनच उमेदवारी अर्ज घेतला, अशी माहिती अनिकेत शास्त्री यांनी एबीपी माझाला दिली आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघाचा महायुतीचा तिढा कायम असताना महंत अनिकेत शास्त्री यांच्या दाव्याने शिवसेनेच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे.
उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?
दरम्यान, नाशिक लोकसभा मतदारसंघातून हेमंत गोडसे (Hemant Godse), छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), अजय बोरस्ते (Ajay Boraste), माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्या नावाची चर्चा असतानाच थेट भाजपकडून अनिकेत शास्त्री यांचे नाव समोर आल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आता महायुतीतून नेमकी उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? हे पाहणे महात्वाचे ठरणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या