Chhagan Bhujbal : नाशिक लोकसभा मतदारसंघातून (Nashik Lok Sabha Constituency) निवडणुकीत माघार घेतलेले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे समता परिषदेच्या (Samata Parishad) माध्यमातून महायुतीवर (Mahayuti) दबावतंत्र वापरत असल्याची चर्चा सध्या रंगली आहे.
राज्यभरात 5 जागांवर समता परिषदेचे पदाधिकारी लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे समजते. पाचही पदाधिकाऱ्यांनी आपले उमेदवारी अर्ज घेतले आहेत. नाशिक, छत्रपती संभाजी नगर, बीड, दक्षिण अहमदनगर आणि कल्याण या मतसंघातून समता परिषद निवडणूक लढवणार असल्याची माहिती मिळत आहे. समता परिषदेच्या आडून भुजबळांचा ओबीसींची ताकद दाखवण्याचा प्रयत्न सुरु आहे का? अशी चर्चा आता रंगली आहे.
हे पाच उमेदवार लोकसभेच्या रिंगणात
1. दिलीप खैरे - नाशिक
2. मनोज घोडके - छत्रपती संभाजी नगर
3. संतोष रासवे - बीड
4. गोरख आळेकर - दक्षिण अहमदनगर
5. मोतीराम गोंधळी - कल्याण
काही लोक आमचे ऐकणार, काही ऐकणार नाही - छगन भुजबळ
याबाबत छगन भुजबळ म्हणाले की, काही लोक आमचे ऐकणार आहेत, काही लोक ऐकणार नाही, अनेक घडामोडी झाल्या त्याचे प्रतिबिंब पडत असते. अनेक जण ऐकतायत महायुतीचे काम करतायत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. आता यावर महायुतीचे नेते नेमकी काय प्रतिक्रिया देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नाशिकच्या जागेवरून छगन भुजबळांचा महायुतीला टोला
छगन भुजबळ यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना नाशिकच्या जागेवरून महायुतीला खोचक टोला लगावला आहे. छगन भुजबळ म्हणाले की, नाशिकच्या जागेवर माझ्यामुळे अडचण होत आहे, असे वाटले. म्हणून मी निवडणुकीतून दूर झालो. आता अर्ज भरायलाही सुरुवात झालीय. नाशिक लोकसभेसाठी 20 मे रोजी मतदान पार पडणार आहे. तोपर्यंत तरी महायुतीने येथे उमेदवार जाहीर करावा, असा टोला त्यांनी लगावला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या