नाशिक : नाशिकमधील (Nashik News)  डेंग्यूच्या (Dengue )  प्रादुर्भावावरुन काँग्रेस पक्ष आणि ठाकरे गट आक्रमक झाला आहे. महापालिका इमारतीच्या गच्चीवर डासाची उत्पत्ती स्थळे असल्याची बातमी एबीपी माझाने दाखवली होती. त्यानंतर आज काँगेस पदाधिकाऱ्यांनी मनपा आयुक्ताना डेंग्यू डासाची प्रतिकृती भेट दिली. तर काँग्रेसपाठोपाठ ठाकरे गटाचे पदाधिकारी देखील मनपा आयुक्त अशोक करंजकर यांच्या भेटीसाठी पोहोचले. ताबडतोब डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्याची मागणी पदाधिकाऱ्यांनी केली.
 
नाशिक शहरात जागोजागी डेंग्यूचे डास, अळ्या दिसत असून घराघरात डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत. डेंग्यूचा उद्रेक रोखण्यात अपयशी ठरलेल्या नाशिक महापालिकाने नागरिकां जबाबदार धरत दंडाची रक्कम दुपटीने वाढवली आहे. नागरिकांना दंड आकारणी करणाऱ्या  मनपा प्रशासनाची परिस्थिती लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण अशी झाली आहे.महापालिका मुख्यालयाच्या इमारतीबरच पाण्याचे डबके आणि त्यात डासांच्या अळी एबीपी माझाच्या कॅमेरात कैद झाल्या आहेत.  यानंतर राजकीय पक्षाच्या नेत्यांनी मनपाचा धावा करत आयुक्तांना धारेवर धरले. काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी डेंग्यू डासांची प्रतिकृतीच मनपा आयुक्तना भेट दिली. तर ठाकरे गटाचे खासदार राजभाऊ वाजे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मनपा प्रशासनाला अल्टीमेटम देत आंदोलनाचा इशारा दिलाय.


मनपा आयुक्तांचा अजब दावा


डेंग्यूच्या बाबतीत उपाययोजना करण्यात हलगर्जीपणा करणारे मनपा प्रशासन राजकीय नेत्यांच्या इशारानंतरही ढिम्मच दिसले. पाऊस जोरदार पडत नसल्यानं डासांची संख्या वाढत असल्याचा दावा महापालिकाने केला आहे. एवढ्या तज्ज्ञ डॉक्टर अधिकारीची फळी असताना देखील शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकारी फवारणीसाठी सांगितलेल्या औषधाचा वापर करण्यासंदर्भात विचार करू असा अजब दावा मनपा आयुक्तांनी केला आहे.


एबीपी माझाच्या बातमीने खडबडून जागे


शहरात रोजच डेंग्यू रूग्ण संखेत वाढ होतं आहे, त्यावर नियंत्रण मिळविण्यात अपयशी ठरलेल ढिम्म प्रशासन एबीपी माझाच्या बातमीने खडबडून जागे झाले आहे.  राजकीय पक्षांनीही विरोधाची धार वाढवली असल्यानं डेंग्यू रुग्ण संख्या कमी होणार का धूर फवारणी होणार काअसा सवाल उपस्थित होत आहे.


हे ही वाचा :


Nashik Dengue Update : नाशिकमध्ये धोक्याची घंटा, 15 दिवसांत 200 डेंग्यूचे रुग्ण; महानगरपालिका फास्ट ट्रॅकवर कामाला