Nashik Dengue Update नाशिक : नाशिककरांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. नाशिक शहरामध्ये साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव झपाटणे वाढताना पाहायला मिळत आहे. मागील सहा महिन्यात डेंग्यूच्या (Dengue) रुग्णांमध्ये मोठी वाढ होत होती, मात्र जून आणि जुलै महिन्यात डेंगूच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ पाहायला मिळालीय. तर सध्या जुलै महिन्याच्या पंधरा दिवसात दोनशे डेंग्यू बाधित रुग्ण आढळून आले असून नाशिक (Nashik) महानगरपालिकेचे आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. महानगरपालिकेच्या (Nashik NMC) आरोग्य विभागाकडून विविध पथके नेमून शहरात विविध ठिकाणी तपासणी सुरू करण्यात आली आहे.
महानगरपालिका फास्ट ट्रॅकवर कामाला
यापूर्वीच्या सहा महिन्यात तब्बल 300 संशयित डेंग्यू रुग्ण आढळले आले होते आणि त्यातही जून महिन्यात तीनशे पैकी एकशे साठ रुग्ण बाधित होते. परिणामी केंद्राचे आरोग्य पथक नाशकात आले असता पथकालाही डेंगूच्या आळ्या आढळून आल्या होत्या. सध्या शहरात सर्वत्र डेंगूचे रुग्ण वाढत असून महापालिकेची यंत्रणा चांगलीच कामाला लागली आहे. विविध भागात पालिकेचे अधिकारी, कर्मचारी, आशा वर्कर्सकडून तपासणी करण्यात येत आहेत. तसेच नागरिकांनीही योग्यती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पंधरा दिवसातच तब्बल 200 डेंग्यूचे रुग्ण
नाशिक शहरात आरोग्य व्यवस्था संपूर्णतः डळमळीत झाल्याचे चित्र आहे. साथीच्या रोगांच्या प्रादुर्भावाने नाशिककर हैराण झाले आहे. जानेवारी 2024 पासून आजपर्यंत तब्बल 365 डेंग्यूचे (Dengue) रुग्ण आढळले आहेत. तर सध्या जुलै महिन्याच्या पंधरा दिवसात दोनशे डेंग्यू बाधित रुग्ण आढळून आले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्राकडून नाशिक महापालिकेला (Nashik NMC) डासांची उत्पत्ती स्थळे शोधून तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शहरात जुलै महिन्याच्या पंधरा दिवसातच तब्बल 200 डेंग्यूचे रुग्ण आढळले आहे. नाशिक (Nashik) महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या डासांची उत्पत्ती स्थळे सर्वाधिक असल्याचं निदर्शनास आले आहे. फ्रिज, झाडांच्या कुंड्या, घरांचे छत हे डासांचे प्रमुख उत्पत्ती स्थळे महापालिकेला मिळून आले आहेत. नागरिकांनी एक दिवस ड्राय डे पाळावा, असे आवाहन नाशिक मनपाच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
डेंग्यूला उत्पत्ती स्थळे आढळल्या प्रकरणी 98 हजारांचा दंड
शहरातील सिडको व नाशिकरोड डेंग्यूचे हॉटस्पॉट ठरत असून, येथे आठवड्याभरात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे वाढता धोका पाहता सहाही विभागात विशेष तपासणी मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यात घरोघरी भेटी दिल्या जाणार असून, घरात व अवतीभोवती डेंग्यू डासांच्या अळ्या व उत्पत्तीसाठी पोषक वातावरण नाही ना, याची तपासणी केली जाणार आहे. संपूर्ण शहरात पंधरा दिवस ही मोहीम राबवली जात आहे. मलेरिया विभागाने बांधकाम प्रकल्प, झोपडपट्टी भाग यांसह विविध ठिकाणी भेटी देत डेंग्यूला उत्पत्ती स्थळे आढळल्या प्रकरणी 98 हजारांचा दंड आकारला आहे.
डेंग्यूचा कहर
महिना बाधित रुग्ण
जानेवारी २२
फेब्रुवारी ५
मार्च २७
एप्रिल १७
मे ३९
जून १६१
हे ही वाचा