Chhagan Bhujbal : आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भात झालेल्या बैठकीबाबत राज्य सरकारनं विश्वासात घेतले नाही, या शरद पवार (Sharad Pawar) यांच्या आरोपात तथ्य असणे शक्य असल्याचे मत मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी व्यक्त केले. मात्र, राज्याचे ज्येष्ठ नेते म्हणून त्यांना तर पुढे यावेच लागेल, की बघत बसणार गावागावातील लढाया? असा सवाल मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवार यांना येवला दौऱ्यावर असताना केला.


शरद पवार मार्ग काढतील याची मला खात्री 


राज्य सरकारनं त्यांना विश्वासात घेतले की नाही हे बाजूला सारुन राज्यात ज्येष्ठ नेते म्हणून त्यांना प्रयत्न करावे लागतील असे छगन भुजबळ म्हणाले. मराठवाडा नामांतर लढ्याप्रसंगी असेच वाद हाणामाऱ्या झाल्या होत्या. मात्र, त्यात शरद पवार यांनी मार्ग काढलाच होता असे छगन भुजबळ म्हणाले. राज्यात यापूर्वीही शरद पवार व बाळासाहेब ठाकरे यांच्यात टोकाची टीका होत होती. मात्र, राज्याच्या प्रश्नाबाबत ते एकत्र येऊन त्यात मार्ग काढत होते. आताही शरद पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका करतात. परंतू शेती विषयक प्रश्न सोडविण्यासाठी एकत्र बसतात. त्याचप्रमाणे आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भात देखील शरद पवार मार्ग काढतील याची मला खात्री असल्याचा विश्वास भुजबळ यांनी व्यक्त केला. 


सर्वच गोष्टी राजकीय दृष्टीने बघू नये काही प्रश्न सामाजिकही असतात


शरद पवार पत्रकार परिषदेत काय बोलले मला माहित नाही. मात्र ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचे उपोषण सोडताना मी काय आश्वासन दिले त्यांना सांगितले आहे. मात्र, मनोज जरांगे पाटील उपोषण सोडण्यासाठी मुख्यमंत्री गेले होते, त्यांनी काय आश्वासन दिले मला माहित नाही असेही पवार यांना भेटीत सांगितले. त्याबाबत मुख्यमंत्र्यांना भेटून सांगायला लावतो असे सांगितले होते. त्यावर पवार यांनी मी स्वतःच मुख्यमंत्र्यांना फोन करुन माहिती घेतो असे आश्वासन त्यांनी मला दिल्याचे भुजबळ म्हणाले. ते यात लक्ष घालतील. सर्व राजकीय नेते या प्रश्नावर एकत्र बसून मार्ग काढतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याबाबत मी कोणालाही भेटायला तयार असल्याचा पूर्णउच्चारही भुजबळ यांनी  केला. सर्वच गोष्टी राजकीय दृष्टीने बघू नये काही प्रश्न सामाजिकही असतात असेही भुजबळ म्हणाले.


महत्वाच्या बातम्या:


Sharad Pawar: विरोधक 'त्या' बैठकीला का गेले नव्हते? शरद पवारांनी सांगितलं कारण, भुजबळांच्या भेटीवरही दिली प्रतिक्रिया