Narendra Dabholkar Murder Case : अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे प्रमुख नरेंद्र दाभोळकर (Narendra Dabholkar) यांच्या हत्येप्रकरणी पुण्यातील विशेष न्यायालयाकडून उद्या  10 मे रोजी अंतिम निकाल देण्यात येण्याची शक्यता आहे. दाभोळकरांच्या हत्येनंतर तब्बल 11 वर्षांनंतर दाभोलकर कुटुंबीयांना न्याय मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. सनातन संस्थेच्या पाच कार्यकर्त्यांवर डॉ. नरेंद्र दाभोळकर (Narendra Dabholkar) यांच्या हत्येचा आरोप आणि न्यायालयाकडून त्यांच्यावर आरोप निश्चितीही करण्यात आली आहे. पुण्यातील सीबीआयच्या (CBI) विशेष न्यायालयकडून शुक्रवारी  (दि.10) मे रोजी निकालपत्राचे वाचन करण्यात येणार असल्याची माहित आहे. 


डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांकडे होता. तो नंतर केंद्रीय गुन्हे अन्वेषन विभाग म्हणजेच सीबीआयकडे वर्ग करण्यात आला होता. दरम्यान दाभोळकर हत्या प्रकरणात आत्तापर्यंत काय काय घडलं जाणून घेऊयात...


- 20 ऑगस्ट 2013 रोजी डॉक्टर दाभोलकरांची हत्या


- मॉर्निंग वॉकला गेले असताना दाभोलकरांवर गोळ्या झाडल्या


- सुरुवातीला पुणे पोलिसांकडून तपास


- एम एम कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्येचे धागेदोरे सनातन संस्थेशी - पोलीस


- कलबुर्गी आणि लंकेश यांच्या हत्येच्या आरोपाखाली अटक केलेल्या आरोपींकडून दाभोलकरांच्या हत्येचा उलगडा


- कर्नाटक पोलिसांनी ही माहिती सीबीआयला दिली आणि अटकसत्र सुरु झालं


- पुणे पोलिसांनंतर प्रकरणाचा तपास सीबीआयकडे गेला.  सीबीआयने  मे 2014 मध्ये नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी तपास हाती घेतला.


 - CBI ने पहिल्या आरोपीला अटक केली. तारीख होती 10 जून 2016. CBI हिंदू जनजागृती समितीशी संबंधित वीरेंद्रसिंह तावडेला पनवेलमधून अटक केली.


- वीरेंद्रसिंह तावडेंविरोधात 6 सप्टेंबर 2016 रोजी हत्येचं षडयंत्र रचल्याप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आलं.


- नरेंद्र दाभोलकरांवर गोळ्या कोणी झाडल्या? याचा तपास हत्येनंतर तब्बल 5 वर्षांनी लागला. 10 ऑगस्ट 2018 याबाबत माहिती समोर आली. वैभव राऊत आणि शरद कळसकर नावाच्या दोन व्यक्तींना नालासोपारा परिसरातून अटक करण्यात आली


- सीबीआयने मे 2019 मध्ये वकील व्यवसाय करणाऱ्या  संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावेला डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणी अटक केली. 


- हत्याप्रकरणी अटके करण्यात आलेल्या शरद कळसकरला गुन्ह्यात वापरलेली बंदूक नष्ट करण्याबाबत पुनाळेकर यांनी सल्ला दिला, असा सीबीआयने आरोप केला होता. 


नऊ वर्षांनंतर 5 आरोपींविरोधात दोषारोप निश्चित


सचिन अंदुरे, शरद कळसकर , डॉ. वीरेंद्र तावडे, विक्रम भावे,  संजीव पुनाळेकर - 5 जणांवर आरोप निश्चिती - 15 सप्टेंबर 2021


- वीरेंद्र तावडेवर डॉक्टर दाभोलकरांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप


- शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांच्यावर डॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडल्याचा आरोप


- विक्रम भावेवर हत्येसाठी वापरलेलं पिस्तूल ठाण्याच्या खाडीत फेकून नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप


- 10 मे रोजी हत्याप्रकरणाचा निकाल वाचला जाणार 


इतर महत्वाच्या बातम्या 


Narendra Dabholkar : डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणी 11 वर्षांनी कुटुंबीयांना न्याय मिळणार का? पुणे सत्र न्यायालयाचा आज निकाल