नंदुरबार:  नंदुरबार (Nandurbar News) जिल्ह्यात तीन हजारपेक्षा अधिक मनोरुग्ण  आहे. या रुग्णांची तपासणी तालुका स्तरावरील ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात केली जाते. तपासणीसाठी महिन्यातील एक दिवस प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी कॅम्प लावला जातो. मात्र या कॅम्पमध्ये उपचार करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांना नसल्याचा धक्कादायर प्रकार समोर आला आहे. नंदुरबार जिल्ह्यात मानसरोगतज्ज्ञांची पदे रिक्त असल्याने या रुग्णांवर कर्मचारीच औषध देऊन उपचार केले जात असल्याची माहिती समोर आली आहे. 


 नंदुरबार जिल्ह्यात तीन हजारपेक्षा अधिक मनोरुग्ण असून या मनोरुग्णांसाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी शासकीय यंत्रणेमार्फत उपचारासाठी कॅम्प लावले जातात. मात्र या कॅम्पमध्ये उपचार करण्यासाठी तज्ञ डॉक्टरांना नसल्याचा समोर आला आहे.  नंदुरबार जिल्हा रुग्णालयातील आणि इतर ठिकाणच्या मानसरोग तज्ञांची पदे अनेक दिवसापासून रिक्त आहेत. मागील डॉक्टरांनी केलेल्या उपचारांप्रमाणेच कर्मचारी औषध देत असल्याचाही या ठिकाणी समन्वयक म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कबुली दिली आहे.  तर दुसरीकडे मानसरोग कॅम्प संदर्भात अनेक अडचणी असल्याचे सांगितले.  यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क करून तक्रारी दिल्या आहेत. मात्र काही उपाययोजना होत नसल्याने आम्हाला अनेक अडचणी येत असल्याचं हे समन्वयक सांगतात.


नातेवाईकांना औषधांसाठी वणवण


 मनोरुग्णाच्या कुटुंबातील नातेवाईकांना औषधांसाठी वणवण करावे लागत असते. तज्ञ डॉक्टर नसल्याने मागील डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधे दिली जात असली तरी ती औषधी देण्यासाठी कर्मचारी रुग्णाला समोर आणण्याचा अटी घालत असतात. मनोरुग्णाला दवाखान्यापर्यंत घेऊन जाणे कुटुंबियांना जिकरीचे ठरते. रुग्णालयात घेऊन गेले तरी औषधी मिळतील याची खात्री नसल्याने नातेवाईकही चांगले संतापले आहेत. 


मानसिक आजाराच्या विळख्यात सापडलेल्या रुग्णांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष


जिल्ह्यात मानसिक आजाराच्या विळख्यात सापडलेल्या रुग्णांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष  होत असल्याने जिल्ह्यातील मनोरुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न समोर आलेला आहे.  एकीकडे सरकार मोठ्या घोषणा करत असले तरी सर्वसामान्य पर्यंत आरोग्य सेवा पोहोचत नसल्याचा यावरून सिद्ध होत आहे.  वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क करून तक्रारी दिल्या आहेत. मात्र काही उपाययोजना होत नसल्याने आम्हाला अनेक अडचणी येत असल्याचं हे समन्वयक सांगतात.


हे ही वाचा :


Palghar News : पालघरमध्ये सर्पदंश झालेल्या व्यक्तीवर उपचार करण्यासाठी रुग्णालयातच अघोरी विद्येचा वापर, प्रकृती आणखी बिघडल्याने दुसऱ्या रुग्णालयात हलवलं