नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील (Nandurbar) शहादा तालुक्यातील 16 ग्रामपंचायतीचा (Grampachayat Result) निकाल हाती आला आहे. यात सर्वाधिक जागांवर भाजपने (BJP) विजय मिळवला आहे. तर उर्वरित सात जागांवर स्थानिक विकास आघाडीने विजय मिळवला आहे. त्यामुळे इतर एकाही पक्षाला साधा भोपळाही फोडता आला नसल्याचे चित्र आहे. भाजपचे मंत्री विजयकुमार गावित (Vijaykumar Gavit) यांनी मोठा विजय मिळवत इतर पक्षांना धक्का दिला आहे, 


नंदुरबार जिल्ह्यातील शहादा (Shahada) तालुक्यातील 16 ग्रामपंचायतच्या मतमोजणी पूर्ण झाली असून, शहादा तालुक्यात भाजपाच्या वर्चस्व राहिला आहे. तर दुसरीकडे स्थानिक विकास आघाडीचे देखील मोठ्या प्रमाणावर ग्रामपंचायती निवडून आल्या आहेत. 16 पैकी 9 ग्रामपंचायतीवर (Grampachayat Election) भाजपाला यश आले आहे. तर 7 जागांवर स्थानिक विकास आघाडीचे उमेदवार निवडून आले आहेत. शहादा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक चुरशीची होणार होती. मात्र, अनेक प्रस्थापितांना धक्का देत स्थानिक आघाडीने मोठी बाजी मारली असल्याचे दिसून येत आहे. या निवडणुकीमध्ये नुकतेच पालकमंत्री पद मिळालेल्या राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात असून, शहादा तालुक्यातील 16 पैकी एकही ग्रामपंचायत राष्ट्रवादीची निवडून आलेली नाही. 


दरम्यान नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात काँग्रेसमधील (Congress) अंतर्गत कलह भाजपच्या पथ्यावर पडला आहे. काँग्रेसमधील अंतर्गत कलहामुळे स्थानिक कार्यकर्त्यांनी स्थानिक विकास आघाडी तयार करत सात ग्रामपंचायतींवर झेंडा फडकवला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांना आत्मचिंतन करायला लावणारी आहे. राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्यासाठी देखील या निवडणुका प्रतिष्ठेच्या होत्या. परंतु, भाजपाचे स्थानिक अंतर्गत वादामुळे डॉ. विजयकुमार गावित यांच्या गटाला कमी ग्रामपंचायती मिळाल्या आहेत. तर आमदार राजेश पाडवी यांना चांगल्या ग्रामपंचायती मिळून आल्या असल्याने शहादा तालुक्यात लागलेला निकाल संमिश्र राहिल्याचे दिसून येत आहे.


नऊ जागांवर भाजपाची सत्ता 


भाजपचे नऊ जागा जिंकून शहादा तालुक्यातील ग्रामपंचायतीवर सत्ता स्थापन केली आहे. तर नऊ जागांवर अपक्ष आले आहेत. यात कमरावद, कुढावद, बिलाडी त.सा, जयनगर, पिंप्री, दामळदा, लोंढारे, लक्कडकोट, कर्जत या ग्रामपंचायतीवर भाजपचं कमळ फुलले आहे. तर आडगाव, गोगापूर, गणोर, विरपूर, वाघोदा, करजई, लांबोळा या ग्रामपंचायतीवर पक्षाची सत्ता आली आहे. या निवडणुकीसाठी भाजपाचे नेते मंत्री विजयकुमार गावित आणि आमदार राजेश पाडवी विरोधात काँग्रेसचे नेते माजी मंत्री आमदार के.सी. पाडवी, पद्माकर वडवी आणि जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक असा संघर्ष पाहण्यास मिळणार होता. मात्र बहुतांश जागा या भाजपाकडे गेल्याने इतर कोणत्याही पक्षाला एकही जागा जिंकता आलेली नाही. 


इतर महत्वाची बातमी : 


Gram Panchayat Election Results LIVE Updates: कोल्हापूरच्या चिंचवाडमध्ये सतेज पाटील, धनंजय महाडिक यांना नाकारलं; अपक्ष उमेदवार श्रद्धा पोतदार सरपंच