Innovative Plan To Plant Four Crore Trees : पर्यावरणाचा (Environment) ढासळत चाललेला समतोल सावरण्यासाठी अनेक सेवाभावी संस्था पुढाकार घेत आहेत. नांदी फाउंडेशन (Nandi Foundation) ह्या अशाच एका सेवाभावी संस्थेने यावर्षी तब्बल 53 लाख वृक्षांची नव्याने लागवड करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. 1023 गावांमधील 27,600 शेतकरी कुटुंबांकडून यांची देखभाल केली जाणार आहे. हा वृक्ष लागवडीचा आकडा लवकरच 4 कोटींपर्यंत जाईल असा विश्वास व्यक्त करणारे ट्वीट महिंद्रा गृपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी नुकतेच केले आहे. हा प्रकल्प पर्यावरण आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याचा दावा नांदी फाउंडेशनचे सीईओ (CEO) मनोज कुमार यांनी केला आहे. 






माणसाच्य गरजा वाढत आहेत असे म्हणण्यापेक्षा वाढत्या लोकसंख्येमुळे एक स्पर्धा निर्माण झालेली आहे. या रोजच्या स्पर्धेत निसर्गाचा कोणीच विचार करताना दिसत नाही. झाडांचा आणि निसर्गाचा खूप जवळचा संबंध आहे. आपल्याला जगण्याकरता लागणारी हवा (Air) आणि पाणी (Water) हे झाडांवरच अवलंबून आहे. वृक्षतोड जर झाली तर आपण आपलेच नुकसान करून घेत आहोत. परिसरात झाडे नसल्याने उष्णता (Temprature) वाढत आहे. तसेच वायू प्रदूषणही (Air Pollution) झाल्याने आरोग्याच्या समस्या वाढत आहेत. वृक्षतोड थांबवून परिसरात जर झाडांची संख्या वाढवली तर माणसाचे आरोग्य सुधारेल आणि दुष्काळ कधीच येऊ शकणार नाही. या सगळ्याचा विचार केल्यास नांदी फाउंडेशनने झाडे लावण्याचा जो निर्धार केला आहे , तो संपूर्ण जगाकरता फायदेशीर ठरू शकतो. 


या प्रकल्पाचा काय फायदा होऊ शकतो? (Benefits Of Nandi Foundation Project)


आपले आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी झाडे (Tree) महत्त्वाची ठरतात. झाडांपासून मिळणारा स्वच्छ ऑक्सिजन (Oxygen) आणि हवा आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी कारणीभूत ठरते. अनेक वृक्षांमध्ये तर औषधी गुणधर्म असतात त्यापासून विविध औषध बनवली जातात. थोडक्यात झाडांपासून आपल्याला नवीन जीवनदान सुद्धा मिळू शकते. 


त्याचप्रमाणे वृक्ष  हे पाऊस पाडण्यासाठी महत्त्वाचे आणि सर्वात गरजेची भूमिका करतात. मातीची होणारी धूप सुद्धा वृक्षांमुळे वाचवली जाते. वृक्षांमुळे अनेक वन्यजीवांचे अस्तित्व टिकून राहण्यास मदत होते. 


ग्लोबल वॉर्मिंग देखील वृक्षांच्या लागवडीमुळे नियंत्रणात येऊ शकते. 


नैसर्गिकरित्या वेस्ट वाॅटर फिल्टर करण्याची क्षमता झाडांमध्ये असते. त्यामुळे झाडे लावल्यास हवाच नाही तर पाणी ही शुद्ध होऊ शकते. 


ही बातमी वाचा: 


National Doctors Day 2023 : भारतात 'डॉक्टर्स डे'ची सुरुवात कधीपासून झाली? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व