Gadar 2: अभिनेता सनी देओलचा (Sunny Deol) आणि अभिनेत्री अमिषा पटेलचा (Ameesha Patel)  यांचा गदर-2 (Gadar 2) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामधील  ‘उड जा काले कावा’ हे गाणं काल (29 जून) प्रेक्षकांच्या भेटीस आले. या गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता नुकतीच अमिषानं गदर-2 या चित्रपटाबाबत एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. अमिषाच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 


अमिषाची पोस्ट


अमिषानं गदर-2 या चित्रपटात सकिना ही भूमिका साकारली आहे. अमिषानं गदर-2 या चित्रपटाच्या टीझरमधील एका सीनचा फोटो सोशल मीडियावर शेअर करुन त्याला कॅप्शन दिलं, 'नमस्कार माझ्या सर्व प्रिय चाहत्यांनो! गदर 2 मधील या शॉटमुळे तुमच्यापैकी बरेच जण चिंतेत आहेत.  सकिनाचा मृत्यू झाला आहे, असं अनेकांना वाटत आहे.पण ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, ती व्यक्ती कोण आहे हे मी सांगू शकत नाही पण ती सकिना नाहीये! त्यामुळे काळजी करू नका !'


नेटकऱ्यांच्या कमेंट्स


अमिषानं ही पोस्ट शेअर करुन गदर-2 चित्रपटाबाबत स्पॉयलर दिला आहे, असं अनेक नेटकऱ्यांचे मत आहे. एका नेटकऱ्यानं अमिषाच्या पोस्टला कमेंट केली,  'काहीच सस्पेन्स राहिला नाही' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'ही तर आता पूर्ण चित्रपटाची स्टोरी सांगेल'






'गदर 2' या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. हा 11 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. अनिल शर्मा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. 


 'गदर 2' हा चित्रपट 'गदर एक प्रेम कथा' या चित्रपटाचा सिक्वेल आहे. या चित्रपटात अमिषानं सकिना ही भूमिका साकारली होती तर सनी देओलनं तारा सिंह ही भूमिका साकारली होती.  'गदर 2' मध्ये सनी देओल आणि अमिषा पाटेल हे प्रमुख भूमिका साकारणार आहेत. गदर एक प्रेम कथाने 22 वर्षांपूर्वी 100 कोटींहून अधिक कमाई केली होती. आता 'गदर 2'हा चित्रपट किती कमाई करेल? याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Gadar 2 : ‘गदर 2' मधील 'ओ घर आजा परदेसी' गाणं आलं प्रेक्षकांच्या भेटीस; तारा सिंह आणि सकिनाचा रोमँटिक अंदाज