Nashik Yoga Day 2023 : आज आंतरराष्ट्रीय योग दिन...(International Yoga Day) दरवर्षीप्रमाणे यंदाही देशभरात योग दिन (Yoga Day) मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. नवव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने योग शिक्षक बाळू मोकळ यांनी नाशिकच्या (Nashik) नांदगाव तालुक्यातील जगधने वाडा येथे सूर्य नमस्कारासह तब्बल अर्धातास 51 योगासन प्रात्यक्षिके कडुनिंबाच्या झाडावरून करून यंदाची ' वसुदैव कुटुंबकम ' ही थीम योग दिनाच्या पार्श्वभूमीवर साजरी केली. 


दरम्यान आपल्या आयुष्यात वृक्ष खूप महत्वाची भूमिका बजावतात. मानवाला ऑक्सिजन देणारे झाड व झाडाच्या सानिध्यातच म्हणजेच झाडावरच योगा करावा जेणेकरून जास्त थकवा पण येणार नाही आणि आसन चांगलें करता येवू शकते. म्हणून यंदा झाडाची निवड केल्याचे मोकळ यांनी सांगितले..पद्मासन, बंध पद्मासन, सर्वांगासन, हालासन, वक्रासन, अर्ध मतसेंद्रासन, भूनमणासान, त्रिकोनासन, विरासन, वृक्षासन, ताडासान, पवनमुक्त आसन, चक्रासन आदी 51 योगासनासह 11 वेळा सूर्य नमस्कारही कडुनिंबाच्या झाडावर केले. यापूर्वी दुचाकीवर देखील मोकळ यांनी यापूर्वी 51 योगासने केली होती..या योगासनांची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये देखील नोंद करण्यात आली आहे.


योगा केल्याने व्याधीच लागत नाही....


मागील 18 वर्षांपासून ते योग शिक्षण देण्याचे काम करत आहेत..आयुष्मान योजने अंतर्गत योग शिक्षक असलेले बाळू मोकळ (Balu Mokal) हे नांदगाव (Nandgaon) येथील रहिवासी असून ते सध्या नाशिक येथे स्थायिक आहेत..आतापर्यंत त्यांनी वेगवेगळ्या शाळा, कॉलेज, संस्था आदी ठिकाणी जावून 150  हून अधिक योग कार्यशाळा घेतल्या आहेत..तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून त्यांनी योग प्रशिक्षण सुरू केले आहे..आदर्श योग शिक्षक, रुग्णसेवा, नाशिक रत्न, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड आदी पुरस्कार त्यांच्या नावावर आहेत..तसेच 3 वेळा राज्यस्तरीय योग स्पर्धेसाठी त्यांची यापूर्वी निवड झालेली आहे. योग शिक्षक बाळू मोकळ म्हणाले की, आपले शरीर आणि मन स्वास्थ्य ठेवण्यासाठी योग साधना काळाची गरज आहे..आजची दिनचर्या बघता आपण शरीराकडे लक्ष देत नाही. जेव्हा शारीरिक व्याधी जाणवू लागतात तेव्हा, आपण व्यायामाकडे वळतो. मात्र रोज योगा केल्याने व्याधीच लागत नाही. आपलं मन आणि शरीर हे सुंदर आणि निरोगी राहून आपण जीवनाचा छान आनंद घेता येऊ शकतो.


हे ही वाचा :                           


International Yoga Day 2023: वयाची साठी तरीही योगसाधनेची महती, समृद्ध शरीरासाठी आजीबाईंचा बटवा